हुक्का पार्लरचा पोलिसांकडून भंडाफोड
अमरावती : तापडिया मॉलमधील हॉटेल एजंट जॅकवर राजापेठ पोलिसांनी रविवारी (दि. 27) धाड टाकून हुक्का पार्लरचा भांडाफोड केला. याप्रकरणात पोलिस उपनिरीक्षक दिनेश माणुसमारे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिस ठाण्यात हॉटेलचालक आरोपी गिरीश लालचंद बत्रा (वय 37, रा. फर्शी स्टॉप, अमरावती), मॅनेजर अवेज शमीउल्ला खान (42, रा. विद्या कॉलनी, अमरावती), वेटर यश ज्ञानेश्वर वाघमारे (21, रा. साईनगर, अमरावती) व योगेश विश्वनाथ रामेकर (22, रा. साईनगर) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
हेदेखील वाचा : Kothrud Constituency Election 2024: कोथरूडमध्ये राजकारण तापलं? चंद्रकांत पाटील-अमोल बालवडकरांमधील वाद चव्हाट्यावर
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिनेश माणुसमारे यांच्या पथकाने रविवारी दुपारी तापडिया मॉलमधील हॉटेल एजेन्ट जॅकवर धाड टाकली असता, तेथे हुक्का पार्लर सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलचालक, मॅनेजर व वेटरला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर ते ग्राहकांना हुक्का पॉट तयार करून देत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून वेगवेगळ्या रंगाचे काचेचे पॉट, वेगवेगळ्या रंगाचे पाईप, अफजल पान रस हुक्काचे फ्लेवर असलेले पाकीट, वाईट रोस पान हुक्क्याचे फ्लेवर असलेले पाकीट व सोएक्स हुक्क्याचे फ्लेवर असलेले पाकीट असा एकूण 8 हजार 570 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.
मेरिडियन बिझनेस पार्कमध्येही सुरु होता हुक्का पार्लर
मेरिडियन बिझनेस पार्कमध्ये पहाटेपर्यंत चालणाऱ्या हुक्का पार्लरबाबतचा व्हिडिओ ‘नवराष्ट्र डिजिटल’ने प्रसिद्ध केला होता. नवराष्ट्रच्या या व्हिडिओची दखल घेत सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी सदर हुक्का पार्लरवर कारवाई करत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी त्यांच्या निदर्शनास पार्लरमध्ये अनियमितता आढळून आली होती.
हेदेखील वाचा : भाजपचा मुख्यमंत्रिपदासाठी ‘हा’ नवा फॉर्म्युला; निवडणूक जिंकली तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…