Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येने खळबळ;लग्नासाठी वारंवार फोन, घरात जाऊन धमक्या, ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’

लग्नासाठी वारंवार फोन करून तगादा लावणे तसेच घरात जाऊन धमकावल्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना सोयगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दहा तासांत निंभोरा येथील संशयित तरुणाला अटक केली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 12, 2026 | 04:39 PM
१९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येने खळबळ;लग्नासाठी वारंवार फोन, घरात जाऊन धमक्या, ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर...’

१९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येने खळबळ;लग्नासाठी वारंवार फोन, घरात जाऊन धमक्या, ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर...’

Follow Us
Follow Us:
  • लग्नासाठी मानसिक त्रास आणि धमक्या दिल्याचा आरोप
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत आरोपीला अटक
  • न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली 
छत्रपती संभाजीनगर: लग्नासाठी वारंवार फोन करून तगादा लावणे आणि घरात जाऊन धमकावल्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी वेगाने तपास करत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा तासांत निंभोरा येथील संशयित तरुणाला अटक केली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लग्नासाठी वारंवार फोन केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा (ता. सोयगाव) येथील करण अनिल वाघ हा तरुण गेल्या काही दिवसांपासून गोंदेगाव येथील १९ वर्षीय तरुणीला वारंवार फोन करून लग्नासाठी तगादा लावत असल्याचा आरोप आहे. केवळ फोनवरूनच नव्हे, तर तो तिच्या घरी जाऊनही धमकावत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. लग्नासाठी दबाव टाकत धमक्या दिल्यामुळे तरुणी मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. या सततच्या त्रासामुळे ती भयभीत झाली होती, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर हादरले; लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग अनावर, मेडिकलमध्ये घुसून चालकावर चाकूने वार, अन्…

तरुणीचा मृत्यू

करण वाघ याच्याकडून होत असलेला कथित मानसिक त्रास आणि धमक्या असह्य झाल्याने तरुणीने बुधवारी रात्री गोंदेगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत तरुणीच्या मामाने याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

१० तासांत संशयिताला अटक

फिर्यादीवरून पोलिसांनी करण अनिल वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा तासांत गुरुवारी रात्री निंभोरा येथून करण वाघ याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

हेही वाचा: फरशीवर सांडलेला द्रव ठरला घातक; घरात खेळत होते जुळे भाऊ, अचानक प्रकृती बिघडली अन् रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू

न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

पोलिसांनी शुक्रवारी करण वाघ याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रुणीला आणखी कोणत्या प्रकारे त्रास देण्यात आला होता का, धमकावण्याच्या प्रकारामागे नेमके काय कारण होते आणि या प्रकरणात आणखी काही तथ्ये आहेत का, याचा तपास सोयगाव पोलीस करत आहेत. प्रकरणातील आरोपांची पुढील तपासातून पडताळणी केली जाणार आहे.

Web Title: Pressure to marry repeated calls and threats suspect arrested within 10 hours in connection with the death of a 19 year old woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.