Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bribe News: ८ कोटींची लाच, ३० लाख घेताना अटक; पुण्यातील सोसायटीच्या प्रशासकावर गुन्हा दाखल

जेंव्हा तक्रारदार पोळ यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी तक्रारदार आणि इतर नवीन ३२ सदस्यांना समभाग प्रमाणपत्र देण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2025 | 10:36 AM
Bribe News: ८ कोटींची लाच, ३० लाख घेताना अटक; पुण्यातील सोसायटीच्या प्रशासकावर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:
  • सोसायटीच्या नवीन ३२ सदस्यांना शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी आठ कोटी रुपयांची लाच
  • भास्कर राजाराम पोळ याला अटक
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पोळ यांना पकडले
Bribe News: एका सोसायटीच्या नवीन ३२ सदस्यांना समभाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) देण्यासाठी आठ कोटी रुपयांची लाच मागून, पहिल्या टप्प्यात ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहकार खात्यातील प्रशासकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. तत्कालीन प्रशासक भास्कर राजाराम पोळ (वय ५६, रा. सुश्रुत रेसीडन्सी, नन्हे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह अवसायक विनोद माणिकराव देशमुख (वय ५०, रा. सिंहगड दर्शन सोसायटी, धायरी फाटा), यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडीतील एकता सहकारी सोसायटीच्या जुन्या सभासदांकडून तक्रारदार आणि इतर ३२ नवीन सदस्यांनी समभाग खरेदी केले होते.

India–Russia Deal: भारतीय-रशियन खत कंपन्यांनी करारावर केली स्वाक्षरी! १.२ अब्ज डॉलर्सचा युरिया प्लांट २०२८च्या मध्यापर्यंत

त्यासंदर्भात सहकार विभागाकडे गेलेल्या वादामध्ये या नवीन सदस्यांनी प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे समभाग प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तक्रारदार अनुपस्थित असल्याने त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला. जेंव्हा तक्रारदार पोळ यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी तक्रारदार आणि इतर नवीन ३२ सदस्यांना समभाग प्रमाणपत्र देण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली. त्याच बरोबर भविष्यात सोसायटीच्या लिलाव प्रक्रियेत तक्रारदार सांगतील, त्या व्यक्तीस जागा मिळवून देऊ, असे सांगून पोळ याने आणखी पाच कोटी रुपये जादाची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली.

लाच मागितल्याचे निष्पन्न

या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तांत्रिक पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी सायंकाळी पोळ हे तक्रारदाराच्या शनिवार पेठेतील कार्यालयाजवळ लाच घेण्यासाठी आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पोळ यांना पकडले, याप्रकरणी पोळ यांच्यासह अवसायाकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजिय पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीता मिसाळ आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.

Sangli Crime: सांगलीत भीषण अपघात! बाइकवरून जाताना डंपरची धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना अटक

अहिल्यानगरमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय 48) यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्बल 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. परदेशी यांची नियुक्ती नेवासा भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात असून ते अहिल्यानगरच्या जनरल अरुण वैद्य कॉलनीत राहतात.

पाथरवाला गायगव्हाण (ता. नेवासा) शिवारात तक्रारदार, त्यांचे भाऊ, वडील आणि इतर शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीकडे जाणाऱ्या शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याने तक्रारदारांचे भाऊ आणि शेतकऱ्यांनी 31 जानेवारी 2022 रोजी नेवासा तहसीलदारांकडे रस्ता खुला करण्यासाठी अर्ज दाखल केला.

दुर्दैवी घटना! अमेरिकेत घराला लागलेल्या आगीत भारतीय विद्यार्थीनीचा होरपळून मृत्यू ; कुटुंबावर शोककळा

तहसीलदारांनी मोजणी आदेश देऊन मोजणीचा खर्च अर्जदारांनी भरावा, असा आदेश दिला. मात्र या आदेशाला शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात शिवरस्ता खुला करण्यासाठी होणारा मोजणीचा खर्च सरकारने करावा, अर्जदारांकडून घेऊ नये, असा निर्णय दिला. या प्रकरणात मोजणीसंदर्भात कार्यवाही सुरू असताना परदेशी यांनी सुटकेसाठी लाचेची मागणी केली असल्याचा आरोप असून, त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.

 

 

 

 

Web Title: Pune corruption scandal housing society administrator arrested for 8 crore bribe demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • Bribe News
  • pune crime news

संबंधित बातम्या

भोरच्या मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
1

भोरच्या मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.