हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी करुन ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी यांना रंगेहात पकडले.
दरम्यान, या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.
कथित फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचारी अनिल कुकडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
बी. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (ससून) केलेल्या फर्निचरच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यालयीन वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. यासाठी महानगर पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
शिरूर उपविभागीय कार्यालयातील एका लिपीक महिलेसह दोघांना टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.