(फोटो सौजन्य: Pinterest)
ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?
एफडीएने नियमांचे उल्लंघन, भेसळीचा संशय आणि वैध परवान्याशिवाय दुकान चालवत असल्याच्या विविध आरोपांखाली ‘मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी’ तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
४ टनहून जास्तीचे सामान जप्त
कारावाई दरम्यान अधिकाऱ्यांनी दुकानातून साधारण ८.१४ लाख रुपयांच्या किमतीचे ४,१७२ किलोग्रॅम खाद्यपदार्थांचे सामान जप्त केले. माहितीनुसार, एफडीएने घटनास्थळावरुन चार पदार्थांचे नमूने लॅब टेस्टसाठी पाठवले आहेत.
कागदपत्रांवर पत्ता वेगळ्या ठिकाणी आणि दुकान वेगळ्या ठिकाणी
एफडीएचे जाॅईंट कमिशनर दिगंबर भोगवडे यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान सर्वात मोठी गडबड म्हणजे परवान्याच्या पत्त्यातील विसंगत. दुकानाजवळ ज्या पत्त्याचा परवाना आहे तिथे काम करण्याऐवजी दुसऱ्या अनरजिस्टर्ड जागी मुख्य व्यापाराचे गोदाम चालवले जात आहे. याशिवाय दुकानात खराब दर्जाचे सामान, विना प्रापर लेबलिंग आणि भेसळयुक्त पदार्थ ठेवण्यात आले होते.
शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान प्रवीन गोयल यांनी आरोप केला आहे की, मुलीचे हाय प्रोफाईल प्रकरणात नाव आल्याने मुद्दाम त्यांच्या दुकानाला लक्ष्य केले जात आहे. मात्र, एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ही छापेमारी भेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनासंदर्भातील नियमित प्रशासकीय कारवाई आहे. या कारवाईचा सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.



