आयपीएल 2028 मध्ये नवे संघ असणार? (फोटो - ai gemini)
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. दरम्यान या लीग चा अनखो विस्तार होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आगामी २०२८ च्या हंगामापासून लीगमध्ये किमान दोन नवीन फ्रँचायझींचा (संघांचा) समावेश करण्याची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एका समोर आलेल्या माहितीनुसार, या संभाव्य विस्तारासाठी महाराष्ट्र राज्यातील ‘पुणे’ आणि गुजरात राज्यातील ‘वडोदरा’ ही दोन शहरे फ्रँचायझींच्या शर्यतीत सर्वात आवडते आणि आघाडीचे पर्याय म्हणून समोर आली आहेत. अंतिम निवडीच्या वेळी शहरांच्या यादीत बदल होणे शक्य आहे. परंतु, पुण्यासारख्या क्रीडारसिकांच्या शहराचे नाव आघाडीवर आल्याने महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
आयपीएलचा हा मोठा विस्तार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या नव्या फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी देशांतर्गत बडे उद्योग समूह तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था देखील उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. या प्रचंड जागतिक गुंतवणुकीमुळे प्रत्येक नवीन फ्रँचायझीचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर इतके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२८ च्या हंगामापासून क्रिकेट चाहत्यांना ८ ऐवजी १० नव्हे, तर तब्बल १२ संघांमध्ये आयपीएलची थरारक लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला
या दोन्ही शहरांकडे असलेली उत्तम स्टेडियम्स, फ्रँचायझी मालकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने असलेली अनुकूलता आणि क्रिकेटप्रेमींचा मोठा वर्ग यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती पुणे आणि वडोदराला मिळताना दिसत आहे.
Ans: आयपेल 2028 मध्ये दोन नवीन संघ जोडले जाऊ शकतात.
Ans: पुणे आणि बडोदा हे दोन नवीन संघ आयपीएल 2028 मध्ये जोडले जाऊ शकतात.






