Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या सिया गोयलच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. तिच्या वडिलांच्या पुणे मार्केट यार्डमधील मसाले आणि ड्रायफ्रुट्सच्या दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2026 | 02:41 PM
Crime News : तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

Crime News : तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

Follow Us
Follow Us:
  • एफडीएच्या कारवाईत दुकानातील मोठ्या प्रमाणातील खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
  • काही खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
  • दुकानाच्या परवान्याच्या पत्त्याबाबतही अधिकाऱ्यांनी विसंगती नोंदवली आहे.
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाची मुख्य आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाच्या समस्या वाढल्या आहेत. एकीकडे मुलगी हत्येच्या आरोपात जेलबंद तर दुसरीकडे वडिलांच्या दुकानावर एफडीएने केलेली कारवाई. सिया गोयलचे वडिल प्रवीन गोयल यांचे पुणे मार्केट यार्ड परिसरात मसाले आणि ड्रायफ्रुट्सचे दुकान आहे ज्याच्यावर अन्न आणि औषध विभागाने (FDA) कारवाई केली आहे. मागील काही काळापासून IAS अधिकारी तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये असून त्यांनी राज्यातील अनेक सुप्रसिद्ध फूड चेन्सना टार्गेट करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. यावेळी मात्र आरोपी सिया गोयच्या वडिलांचे दुकान अधिकाऱ्यांच्या निशाणावर आले आहे.

ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?

एफडीएने नियमांचे उल्लंघन, भेसळीचा संशय आणि वैध परवान्याशिवाय दुकान चालवत असल्याच्या विविध आरोपांखाली ‘मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी’ तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

४ टनहून जास्तीचे सामान जप्त

कारावाई दरम्यान अधिकाऱ्यांनी दुकानातून साधारण ८.१४ लाख रुपयांच्या किमतीचे ४,१७२ किलोग्रॅम खाद्यपदार्थांचे सामान जप्त केले. माहितीनुसार, एफडीएने घटनास्थळावरुन चार पदार्थांचे नमूने लॅब टेस्टसाठी पाठवले आहेत.

  • ‘संत’ ब्रँड हळद पावडर
  • ‘साधू’ ब्रँड हळद पावडर
  • तीळ
  • सोयाबीनचे तुकडे
जोपर्यंत लॅब रिपोर्ट येत नाही आणि पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत दुकानातील कोणत्याही प्रकारच्या खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

कागदपत्रांवर पत्ता वेगळ्या ठिकाणी आणि दुकान वेगळ्या ठिकाणी

एफडीएचे जाॅईंट कमिशनर दिगंबर भोगवडे यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान सर्वात मोठी गडबड म्हणजे परवान्याच्या पत्त्यातील विसंगत. दुकानाजवळ ज्या पत्त्याचा परवाना आहे तिथे काम करण्याऐवजी दुसऱ्या अनरजिस्टर्ड जागी मुख्य व्यापाराचे गोदाम चालवले जात आहे. याशिवाय दुकानात खराब दर्जाचे सामान, विना प्रापर लेबलिंग आणि भेसळयुक्त पदार्थ ठेवण्यात आले होते.

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

दरम्यान प्रवीन गोयल यांनी आरोप केला आहे की, मुलीचे हाय प्रोफाईल प्रकरणात नाव आल्याने मुद्दाम त्यांच्या दुकानाला लक्ष्य केले जात आहे. मात्र, एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ही छापेमारी भेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनासंदर्भातील नियमित प्रशासकीय कारवाई आहे. या कारवाईचा सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.

 

Web Title: Pune ketan agrawal murder case siya goyal father shop fda action tukaram munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • FDA
  • Siya Goyal
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
2

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.