Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द

Vaishali And Rupali Hotel:  कच्च्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवणे, कीटकप्रतिबंधक दरवाजांचा अभाव, तापमानाच्या नोंदी नसणे आणि पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही आढळल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2026 | 03:13 PM
FDA Raid at Pune

FDA Raid at Pune

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात एफडीएची एफसी रोडवर मोठी कारवाई 
  • वैशाली, रूपाली हॉटेलचे परवाने रद्द
  • अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतागृहांजवळ अन्नपदार्थांची आढळली तयारी 
Vaishali And Rupali Hotel: पुणे शहरातील एफ.सी. रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंट यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळल्याने दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, परवाने पूर्ववत होईपर्यंत दोन्ही रेस्टॉरंटना अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि घरपोच सेवा देता येणार नाही.

दोन्ही रेस्टॉरंटची तपासणी

एफडीएच्या पथकाने १३ नोव्हेंबर रोजी दोन्ही रेस्टॉरंटची तपासणी केली. हॉटेल वैशालीच्या तपासणीत स्वयंपाकघरातील जागेचे अयोग्य नियोजन आणि अस्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ कच्चा माल ठेवण्यासाठी फ्रीजर, तर पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा ठेवण्यात आला होता. स्वच्छतागृहासमोरील टेबलावर धुतलेली भांडी ठेवण्यात आली होती. तसेच उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियाही असुरक्षित जागेत सुरू असल्याचे आढळले.

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

९८ पैकी केवळ ५८ गुण

तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाल्याने हॉटेलला नियमांचे पालन न करणारे ठरविण्यात आले. कच्च्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवणे, कीटकप्रतिबंधक दरवाजांचा अभाव, तापमानाच्या नोंदी नसणे आणि पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही आढळल्या. यापूर्वी जूनमध्ये सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी कायम असल्याने परवाना निलंबित करण्यात आला.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात धडक कारवाई! तब्बल ५.२ टन खाद्यपदार्थ ताब्यात तर 559 किलो…

सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित रेस्टॉरंटनी सर्व त्रुटी दूर करून पुनर्तपासणीत नियमांची पूर्तता केल्यानंतर आणि प्रशासनाची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच अन्न व्यवसाय सुरू करता येणार आहे. तोपर्यंत कोणत्याही स्वरूपात अन्नपदार्थांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात कोणत्या हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत?

    Ans: एफसी रोडवरील वैशाली आणि रूपाली हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

  • Que: अन्न व्यवसाय कधी सुरू करता येणार?

    Ans: संबंधित रेस्टॉरंटनी सर्व त्रुटी दूर करून पुनर्तपासणीत नियमांची पूर्तता केल्यानंतर आणि प्रशासनाची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच अन्न व्यवसाय सुरू करता येणार आहे.

Web Title: Fda action against vaishali and rupali hotel cancelled license for uncleanliness pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Raid
  • pune news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
1

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Sinhgad Colleges News: पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा निर्णय! सिंहगड संस्थवर ३ वर्षांसाठी प्रशासक नियुक्त
2

Sinhgad Colleges News: पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा निर्णय! सिंहगड संस्थवर ३ वर्षांसाठी प्रशासक नियुक्त

पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन
3

पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा
4

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.