Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: “माझी सासू जबाबदार!”- भावाला मेसेज करून पुण्यात विवाहितेचा संशयास्पद अंत!

Pune Crime News: पुण्याच्या मुकुंदनगरमध्ये ७० लाखांचा हुंडा देऊनही सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून ३४ वर्षीय आयटी इंजिनिअर पायल झांबरे हिने गळफास घेत जीवन संपवले. मृत्यूपूर्वी भावाला पाठवलेल्या "माझी सासू जबाबदार आहे" या मेसेजने संपूर्ण पुणे हादरले असून, स्वारगेट पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 03, 2026 | 10:13 AM
Pune Crime News: "माझी सासू जबाबदार!"- भावाला मेसेज करून पुण्यात विवाहितेचा संशयास्पद अंत!

Pune Crime News: "माझी सासू जबाबदार!"- भावाला मेसेज करून पुण्यात विवाहितेचा संशयास्पद अंत!

Follow Us
Follow Us:
  • ३४ वर्षीय पायल झांबरे यांनी सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या
  • “माझी सासू जबाबदार आहे” असा मेसेज मृतेने भावाला पाठवला
  • पती, सासू, सासरे व नणंदविरुद्ध स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल
Pune Crime News: पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मुकुंदनगर परिसरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ३४ वर्षीय विवाहित तरुणी पायल झांबरे हिने सासरच्या मंडळींच्या सततच्या हुंडाबळी आणि मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. दिवाळी सणाला माहेरहून १० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीवरून तिचा छळ सुरू होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पायलचा पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमका काय घडला घटनाक्रम?

पायलचा भाऊ ऋषीकेश पवार याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, पायल हिचा विवाह १३ मार्च २०१९ रोजी अक्षय अरविंद झांबरे याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. या लग्नात माहेरच्यांनी आपल्या क्षमतेबाहेर जाऊन ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ७० ते ८० लाख रुपयांचा हुंडा दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला. सासू मंगल झांबरे आणि पती अक्षय हे प्रत्येक सणाला माहेरहून पैसे आणि सोने आणण्यासाठी पायलला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.

हेही वाचा: Pune Crime: “भेटायला ये” म्हणून मागे लागले अन् दबा धरून केला वार! पुण्यातून हादरवणारी बातमी समोर!

मुलगी झाली म्हणून रुग्णालयात वाद

सासरच्यांचा छळ केवळ पैशांपुरता मर्यादित नव्हता. ३० मार्च २०२३ रोजी पायलने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगा हवा असल्याचा हट्ट धरलेल्या सासरच्यांनी थेट रुग्णालयात जाऊन वाद घातला. “आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली, आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही,” असे म्हणून ते रुग्णालयातून निघून गेले होते. त्यानंतरही मुलगी झाल्यामुळे तिला वारंवार घालून पाडून बोलणे आणि शिवीगाळ करणे सुरूच होते.

टोकाचं पाऊल उचलण्याआधी भावाला शेवटचा मेसेज

घटनेच्या दिवशी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पायल माहेरहून सासरी परतली होती. सासरी पोहोचल्यानंतर रात्री ९:१८ मिनिटांनी तिने आपला भाऊ ऋषीकेशला मोबाईलवरून एक टेक्स्ट मेसेज पाठवला. ज्यामध्ये तिने अत्यंत स्पष्ट शब्दांत लिहिले होते, “माझी सासू जबाबदार आहे.” हा मेसेज पाहताच घाबरलेल्या भावाने ताबडतोब तिच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने फोन उचलला नाही. त्यानंतर तिच्या पतीला फोन केला असता, त्याने उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली आणि “घरच्या भांडणात पडू नका,” असे सांगून फोन कट केला.

हेही वाचा:Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…

कसा आढळला मृतदेह?

पायलच्या कुटुंबाने रात्री उशिरापर्यंत सासरच्या मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांचे फोन बंद लागत होते. पहाटे सासरच्या मंडळींनी फोन करून पायल घरी न आल्याची माहिती दिली. त्यामुळे संशय आल्याने माहेरचे लोक मुकुंदनगरमधील झांबरे पॅलेस येथील सासरच्या घरी पोहोचले.

तिथे विचारपूस केली असता कुणीच काही सांगत नव्हते. शेवटी पती अक्षय याने पायल समोरील जुन्या फ्लॅटमध्ये असेल असे सुचवले. मुख्य दरवाजा आतून बंद असल्याने फिर्यादी भावाने मागील गॅलरीतील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला. किचनमध्ये पाहणी केली असता, पायलने सिलिंगच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पायल झांबरेच्या आत्महत्येचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: पायल झांबरेच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींकडून दिवाळी सणाला १० तोळे सोने आणण्यासाठी तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

  • Que: आत्महत्येपूर्वी पायलने कोणाला मेसेज केला होता?

    Ans: आत्महत्येपूर्वी पायलने आपल्या भावाला टेक्स्ट मेसेज केला होता, ज्यामध्ये तिने "माझी सासू जबाबदार आहे" असे लिहिले होते.

  • Que: या प्रकरणी कोणाकोणावर गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: स्वारगेट पोलिसांनी पायलचा पती अक्षयअरविंद झांबरे, सासू मंगल झांबरे, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune mukund nagar swargate suspicious death dowry gold harassment sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Dowry Prevention Act
  • Engineering
  • Pune crime news in marathi
  • Swargate Police Station

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.