Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात नक्की काय चाललंय? मध्यवर्ती भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; गुजरातमधील एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यावेळी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीतील लॉजेस तपासत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 22, 2024 | 08:23 PM
पुण्यात नक्की काय चाललंय? मध्यवर्ती भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ;  गुजरातमधील एकाला अटक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपये दराच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौरव रामप्रताप सविता ( वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन गंगाधर शेटे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यावेळी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीतील लॉजेस तपासत होते. त्यावेळी एकजण हा रस्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी तेथून निघून जाऊ लागला. मात्र त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपये दराच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपये रकमेच्या बनावट नोटा आढळल्या. त्यानुसार पोलिसांनी गौरव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

टेम्पो अडवून 18 लाखांचा गुटखा पकडला

 

पुण्यात बंदी असणाऱ्या गुटख्याला मोठी मागणी असल्याचे तसेच तो गुटखा अवैधरित्या विक्री अन् त्याची वाहतूक करणाऱ्यांची साखळी मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून सातत्याने गुटखा पकडला जात आहे. मात्र, हे गुटखा डिलर मोकळेच राहत असल्याचे दिसत आहे. स्वारगेट पोलिसांनी पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करत १८ लाखांचा गुटखा पकडला आहे.

सौरभ उर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४, रा. थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम बाळकृष्ण निंबाळकर (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; टेम्पो अडवून 18 लाखांचा गुटखा पकडला

टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध

गुटखा बंदी असताना देखील पुण्यासारख्या शहरात गुटख्याची विक्री अन् वाहतूक खुलेआम होत असून वारंवार पोलिसांकडून गुटखा पकडला जात असताना गुटखा एजंट मात्र सुसाट सुटल्याचे दिसत आहे. या प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलीस विभागाच्या सहाय्याने होते. असे असताना पुण्यात मात्र, गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक कारवायांमधून हे अधोरेखित देखील झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होत आहे.

 

Web Title: Pune police arrested one accused foe fake currency rasta peth crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 08:23 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.