Lalit Patil escape
पुणे : ललीत पाटील ड्रग्ज प्रकरणी (Drug Case) मोठी अपडेट समोर येत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) आणि त्याच्या 12 साथीदारांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) मोक्का कायद्यांतर्गत (Mcoca Act) पुणे पोलिसांकडून (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
[read_also content=”पुण्यात एनआयएची मोठी कारवाई, आणखी एका दहशतवाद्याला अटक! अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग https://www.navarashtra.com/maharashtra/pune-nia-arrest-one-more-terrorist-who-involve-in-many-terrorist-activities-nrps-477156.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, तपासा दरम्यान पोलिसांनी ललित पाटीलकडून 5 किलो सोन जप्त केलं. ड्रग्स विकून मिळालेल्या पैशातून ललितनं हे सोनं विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. . गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले. ललित पाटीलने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते. यापूर्वीही त्याच्याकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते. आतापर्यंत आठ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.