Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime News: बीडमध्ये पवनचक्कीवरून राडा; सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षक रूप सिंग टाकलाने चोरट्यांवर गोळीबार केला.

  • By anuradha sagar
Updated On: May 23, 2025 | 01:30 PM
Beed Crime News: बीडमध्ये पवनचक्कीवरून राडा; सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

Beed Crime News:  बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या पवनचक्की वादाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले आहे. लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्रकल्पात सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील पवनचक्की प्रकल्पात काही अज्ञात चोरटे साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले होते. त्याच दरम्यान, प्रकल्पाच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला आहे. घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी सुरक्षारक्षकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Uttar Pradesh News: गजवा-ए-हिंदचे स्वप्न, संशयास्पद हालचाली; युपीत ISIचा स्लीपर सेल मोहम्मद तुफैलला ATSकडून अटक

याच पवनचक्की प्रकल्पामुळे काही महिन्यांपूर्वी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यामुळे परिसर आधीपासूनच तणावाखाली होता. आता पुन्हा एकदा त्या प्रकल्पावरून रक्तस्रावाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्कीच्या वादाला धार चढलेली असतानाच, लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याच्या यार्डमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रकार घडत होते. यामुळे सुरक्षेची गरज ओळखून याठिकाणी अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते.

गोळीबारात चोरटा ठार, सुरक्षारक्षक अटकेत

गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षक रूप सिंग टाकलाने चोरट्यांवर गोळीबार केला. गोळी एका चोरट्याला लागली आणि तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि सुरक्षारक्षक रूप सिंग टाकला याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Vaishnavi Hagavane News: छुपे कॅमेरे, पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ…; वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणचे

सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

सततच्या चोरीच्या घटना आणि आता झालेल्या गोळीबारामुळे पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढील कायदेशीर कारवाई आणि पोलिस तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rage over windmill in beed one killed in security guards firing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Beed crime News
  • Beed Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.