Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: ‘स्पेशल २६’ पाहून रचला कट; बनावट रेड टाकून व्यापाऱ्याचे अपहरण, १ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

सिनेमा पाहून गुन्ह्याचा कट रचला, बनावट अधिकाऱ्यांचा पेहराव केला आणि व्यापाऱ्याच्या कार्यालयात तब्बल तीन तास रेड चे नाटक रंगवले. मात्र, आरोपींची एक छोटीशी चूक पोलिसांच्या लक्षात आली अन् १ कोटींच्या खंडणीचा हा कट थेट पोलिसांच्या जाळ्यात पोहोचला

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 06, 2026 | 02:41 PM
Mumbai Crime News: ‘स्पेशल २६’ पाहून रचला कट; बनावट रेड टाकून व्यापाऱ्याचे अपहरण, १ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

Mumbai Crime News: ‘स्पेशल २६’ पाहून रचला कट; बनावट रेड टाकून व्यापाऱ्याचे अपहरण, १ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • बनावट अधिकारी बनून व्यापाऱ्याच्या कार्यालयात रेड
  • मोबाईल जप्त करून कर्मचाऱ्यांची चौकशी
  • कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांना अटक
Mumbai Fake Raid:  चित्रपटातील गुन्हेगारी कटाची नक्कल करून प्रत्यक्षात व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणे आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे बनावट अधिकारी बनून एका व्यापाऱ्याच्या कार्यालयावर ‘रेड’ टाकण्यात आली. व्यापारी आणि त्यांच्या पत्नीला टॅक्सीत बसवून नेल्यानंतर १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा अंधेरी पोलिसांनी तपास करून मुंबई आणि पुण्यातून सहा संशयितांना अटक केली आहे.

‘स्पेशल २६’ची नक्कल

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आधी व्यापाऱ्याच्या कार्यालयात प्रवेश केला. तेथे त्यांचे काही साथीदार आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी स्वतःची ओळख आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी अशी करून दिली. त्यानंतर व्यापारी, त्यांच्या पत्नी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले.

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

तीन तास ‘रेड’चे नाटक

आरोपींनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी एका आरोपीने बनावट ‘सर्च वॉरंट’ दाखवून व्यापाऱ्याची सही घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर मोठा दंड होण्याची भीती दाखवत प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. सुमारे तीन तासांहून अधिक काळ हे बनावट रेडचे नाटक सुरू होते. रात्री आठच्या सुमारास आरोपी तेथून निघून गेले.

पोलिसांनी शोधला क्लू

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कॉल डिटेल्स, मोबाईल डेटा, लोकेशन तसेच परिसरातील सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

मुंबई-पुण्यातून सहा जण अटकेत

तपासाअंती पोलिसांनी संतोष खोपकर (३७) आणि विनय मोरे (३७) यांना मुंबई उपनगरातून अटक केली. फोन बंद करून पसार झालेल्या प्रेम सबनानी (५०) याला पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. प्रज्ञा एच. एम. (२७) हिला अंधेरी पूर्व आणि रेश्मा श्यामराव वारंग (४१) हिला नालासोपारा येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात शबीना शेख (४८), जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे (५७) यांचीही नावे समोर आली आहेत. यातील जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे हे मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका गुन्ह्यात यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्य सूत्रधाराचा शोध

पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनची तपासणी सुरू केली आहे. व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड तसेच आर्थिक व्यवहार तपासले जात असून या कटामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Web Title: Raid on traders office by imposters posing as officials after a three hour dramasingle clue led to their exposure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.