Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : पोफळीतील पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार? ठेवी थकल्या; बोगस कर्ज कागदपत्रांचा आरोप

तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 09, 2026 | 03:55 PM
Ratnagiri News : पोफळीतील पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार? ठेवी थकल्या; बोगस कर्ज कागदपत्रांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • पोफळीतील पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार?
  • ठेवी थकल्या; बोगस कर्ज कागदपत्रांचा आरोप
चिपळूण : तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. संस्थेतील ठेवी थकल्या असून, बोगस कर्ज प्रकरणं आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

पोफळी येथील महानिर्मिती कंपनीतील कामगार, कर्मचारी व अभियंते यांनी स्थापन केलेल्या या पतसंस्थेकडे सुमारे 62 सभासदांचे दोन कोटी 25 लाख रुपयांचे ठेव खाते असल्याची माहिती असून, ही रक्कम परत न मिळाल्याने सभासदांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्जवसुलीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

दरम्यान, सहकारी बँकेने महानिर्मिती विभागाला थेट वसुली करण्याचे पत्र दिले असून, याशिवाय संस्थेविरोधात आणखी दोन गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. दिव्यांग निवृत्त कार्यकारी अभियंता प्रमोद हरिश्चंद्र मोने यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या ३६ लाख रुपयांच्या ठेवीची परतफेड न झाल्याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.

तसेच, आपल्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करून 6 जून 2022 रोजी पाच लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा आरोप सभासद अमोल जगन्नाथ सपकाळ यांनी केला आहे. हे कर्ज आता सहा लाख रुपयांपर्यंत वाढले असून, आपण कोणत्याही कर्ज प्रकरणास सहमती दिली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संस्थेने जिल्हा बँकेकडून वलीन कॅश क्रेडिटच्या माध्यमातून दोन कोटी 55 लाख रुपये उचलल्यामुळे, भविष्यात ही रक्कम थकित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्ही तक्रारदारांनी संचालक मंडळाची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणामुळे पोफळी महानिर्मिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सभासदांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व सभासदांनी सहकार विभागाने तातडीने चौकशी सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू

Web Title: Ratnagiri news financial irregularities in a credit institution in pophali deposits exhausted allegation of bogus loan documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 03:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.