Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election: पुण्यात रूट मार्च दरम्यान पोलिसांना धक्काबुकी; रिक्षाचालकाला अटक तर दोघांवर गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात फेरी (रुट मार्च) काढण्यात येत आहे. पर्वती पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी जनता वसाहत भागातून रुट मार्च काढण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2024 | 07:33 PM
Maharashtra Election: पुण्यात रूट मार्च दरम्यान पोलिसांना धक्काबुकी; रिक्षाचालकाला अटक तर दोघांवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी व इतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागू नये साठी पोलीस प्रशासन देखील योग्य ती कार्यवाही करत आहे. दरम्यान पुण्यातील पर्वती भागात रूट मार्च करत असताना पोलिसांना धकाबुक्की करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहत भागातून काढण्यात आलेला ‘रुट मार्च’ अडवून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. रिक्षाचालक, त्याची पत्नी आणि आईने पोलिसांशी झटापट केली. पत्नी आणि आईने पोलीस कर्मचाऱ्याचा हाताचा चावा घेतला. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, पर्वती पोलिसांकडून त्याची आई आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिस कर्मचारी अविनाश कांबळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक सोमनाथ दास चौधरी (वय ४०, रा. पर्वती) याला अटक केली. त्याची त्याची पत्नी राणी (वय ३२) आणि आई सीताबाई (दोघी रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनता वसाहतीतील शंकर मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा : पुण्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? धारदार हत्यारांनी वार करत गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात फेरी (रुट मार्च) काढण्यात येत आहे. पर्वती पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी जनता वसाहत भागातून रुट मार्च काढण्यात आला. रुट मार्चमध्ये पर्वती पोलीस ठाण्यातील ७ पोलिस अधिकारी, ४३ पोलिस कर्मचारी आणि सीमा सुरक्षा दलाची (बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स) एक तुकडी, पोलिसांची वाहने सहभागी झाली होती. परतीच्या मार्गावर जनता वसाहत परिसरातील गल्ली क्रमांक १०८ च्या दिशेने रिक्षाचालक चौधरी निघाला होता. पोलीस कर्मचारी खाडे आणि सुर्वे यांनी पोलिसांचे वाहन जाण्यासाठी त्याला रिक्षा रस्त्याच्या कडेला लावण्याची विनंती केली. त्याने रिक्षा बाजूला न घेता रस्त्यामध्ये आडवी लावली. रस्ता अडवून त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावून सांगितले.

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालक चौधरीने आरडाओरडा केला. तेव्हा परिसरातील रहिवासी तेथे जमले. चौधरीला पोलीस कर्मचारी कांबळे यांनी समजावून सांगिले. रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले. तेव्हा त्याने कांबळेंना धक्काबुक्की केली. चौधरीची पत्नी आणि आईने पोलिसांना दगड भिरकावून मारला. महिला पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. तेव्हा दोघींनी महिला पोलिसांच्या हाताचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौधरीला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.

 

Web Title: Rikshaw driver and two persons wrong behaviour with police during election route march parvati pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 07:31 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
1

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
2

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
3

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन
4

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.