पोलिस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून केली हत्या; सासूसह मेहुणा गंभीर
नागपूर : कुटुंब गाढ झोपेत असताना काही मुखवटाधारी दरोडेखोर घरात घुसले. शस्त्राचा धाक दाखवून पती-पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि जवळपास 14 लाख रुपयांचा माल लुटून फरार झाले. ही खळबळजनक घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत खसाळा-मसाळाच्या माँ जगदंबानगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी राजेश छेदीलाल पांडे (वय 60) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.
हेदेखील वाचा : संभाजीनगर ते नागपूर राज्य महामार्गावर 12 तासात 2 अपघात; दोघांचा मृत्यू तर दोन जखमी
राजेश एका ट्रान्सपोर्ट कंपनीत व्यवस्थापक आहेत. खसाळा-मसाळाच्या माँ जगदंबानगरात त्यांची दुमजली इमारत आहे. मंगळवारी रात्री राजेश, पत्नी किरण आणि मुलगी शिवानी घरी झोपले होते. रात्री 2.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नीची कशाच्या तरी आवाजाने झोप उघडली. त्यांनी हॉलमध्ये जाऊन पाहिले असता 25 ते 40 वर्षे वयोगटातील 5 मुखवटाधारी हातात चाकू आणि रॉड घेऊन दिसले.
किरण यांनी राजेशला झोपेतून उठवले. आरोपींनी त्यांना मारण्याची धमकी देऊन आरडा-ओरड करण्यास मनाई करत घरातील मौल्यवान वस्तूंबाबत विचारपूस केली. आरोपींनी राजेश, किरण आणि शिवानी यांना बेडरूममध्ये डांबले. कपाटातून सोन्याचा हार, बांगड्या, अंगठी, कानातले दागिने असे 164 ग्रॅम सोने, 6 लाखांची रोकड आणि 250 ग्रॅम चांदी लुटली.
पतीला घेऊन गेले सोबत
दागिणे लुटल्यानंतर आरोपींनी राजेशला घरापुढे उभ्या एसयूव्हीची चावी मागितली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही उचलला. घरातील तिघांचे 6 मोबाईल फोनही उचलले. एका आरोपीने किरण आणि शिवानीला वरच्या माळ्यावर जाण्यास सांगितले आणि राजेशला सोबत घेतले. त्यानंतर आरोपींनी राजेशला उप्पलवाडीच्या नाका नंबर 2 जवळ हनुमान डॅमजवळ वाहनातून उतरवण्यात आले. मोबाईल आणि काही अंतरावर मिळतील असे सांगून आरोपी फरार झाले.
ट्रकचालकाला मागितली मदत
राजेश पायदळ चालत हनुमान डॅमपर्यंत पोहोचले. एका ट्रक चालकाला थांबवून मदत मागितली आणि त्याच्या फोनने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. मांझी रेल्वे बोगद्याजवळ पोलिसांना राजेश यांचे वाहन मिळाले. त्यात सर्व 6 मोबाईलही ठेवलेले होते. झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचा आढावा घेतला.
टीपच्या आधारावर दरोड्याचा संशय
टीपच्या आधारावर हा दरोडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींनी आधी घराची रेकी केली. राजेशच्या घरून मोठी रक्कम हाती लागण्याची आशा होती. ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असताना दरोड्याची ही घटना घडल्याने पोलिसांत खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेची 3 पथके आरोपींचा शोध घेत आहेत.