File Photo : Accident
डोणगाव : छत्रपती संभाजीनगर ते नागपूर राज्य महामार्गावर 12 तासात 2 अपघात घडल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. 17) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ऑटोरिक्षा व दुचाकीचा अपघात होऊन यामध्ये 1 जण गंभीर जखमी तर दोन किरकोळ जखमी झाले. तर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आयशर व स्कूटीचा अपघात होऊन यामध्ये एक महिला ठार झाली.
हेदेखील वाचा : युट्यूबवर व्हिडिओ बघून चोरी करायला शिकला; पोलिसांनी सापळा रचला आणि…., बदलापुरातील धक्कादायक घटना
सदर अपघात हा बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस स्टेशनअंतर्गत राज्य महामार्गावरील नागापूरजवळ घडला असून, दुसरा अपघात हा डोणगावजवळील एका एअर हाऊसजवळ घडला. अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली, तर दुसऱ्या अपघातातील एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. मेहकर ते डोणगाव रोडवरील लांडे वाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.18) सकाळी 8:30 वाजता स्कूटी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, आयशर चालकाला ताब्यात घेऊन वाहन पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. सदर अपघातप्रकरणी पुढील तपास डोणगाव पोलिस करीत आहेत.
दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू
मेहकरहून येणाऱ्या स्कूटीला नागपूरकडून मेहकरकडे जाणाऱ्या कारला (एमएच 04/जीआर- 0867) धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटीस्वार तरुणी वैष्णवी किरण चंदनशिवे (रा. अण्णा भाऊ साठेनगर, मेहकर) हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवी ग्रामीण कुटा फायनान्समध्ये काम करत होती आणि सकाळी वसुलीसाठी जात असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस हर्ष सहगल आणि पोलिस मित्र रहीम खान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ऑटोरिक्षा-दुचाकी अपघातात दोन जखमी
डोणगाव ते मेहकर राज्य महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ ऑटो व दुचाकी अपघातात दोन जखमी झाले. मंगळवारी (दि. 17) रात्री 7.30 वाजता हा अपघात घडला. डोणगावकडून मेहकरकडे जाणारी रिक्षा (एमएच28/आर-2265) व डोणगावकडे येणारी दुचाकी (एमएच 28/एबी-7097) मध्ये धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार नितीन तेलकर डोणगाव हा जखमी झाला. तसेच धडकेनंतर ऑटो उलटून बबन मधुकर चनखोरे (बोरी, ता. मेहकर) हे जखमी झाले. ऑटोमध्ये तिघे बसलेले होते. अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली.
हेदेखील वाचा : Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी ‘या’ पॅटर्नचा सर्वाधिक वापर