
Rohit Arya Encounter:
Rohit Arya Viral Video: मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण त्याच्या मृत्यूनंतर रोहितचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याची पत्नी त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. तसेच रोहितच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर मी तुम्हाला सोडणार नाही, असंही भावनेच्या भरात बोलताना ती दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 2024 मधला आहे. गेल्या वर्षी रोहित आर्यने पुण्यात उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान तो बेशुद्धही पडला होता. शिक्षण विभागाकडून त्याचे प्रलंबित पैसे न मिळाल्याने नाराज रोहित आर्य पुण्यात उपोषणावर होता. दोन आठवड्यांहून अधिक काळ उपोषणावर राहिल्यानंतर, १९ ऑगस्ट २०२४ रोजी रोहितची प्रकृती लक्षणीयरीत्या बिघडली, ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. सामाजिक कार्यकर्ते सूरज लोखंडे यांना रोहित आर्यला रुग्णालयात दाखल केले. गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला रोहितला त्याची पत्नीसह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
रोहित आर्यला रुग्णवाहिकेतून घेऊन जाताना त्याच्या पत्नीच्या भावना अनावर झाल्या होत्या. ढसाढसा रडत ती रोहितच्या उपारासाठी मदतीची याचनाही करत होती. ” आज एक महिना झाला त्याला उपोषण करताना पण मंत्रीमहोदयानी देखील त्याला आमचं प्रोजेक्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी काहीच केलं नाही. मंत्रीमहोदय आज मी तुम्हाला स्पष्ट सांगते जर तो वैकुंठला गेला ना मी सोडणार नाही कोणालाही. त्याला किती त्रास असतो तुम्हाला काहीच कळत नाहीये. आमचे नेक्स्ट जेन स्वच्छचा मॉनिटर हे आमचे मिशन सुरू होते. रोहितने हे सुरु केलं होते. केसरकरसाहेबांना ते आवडलही होतं त्यांनी माझी शाळा सुंदर शाळा यातही ते घेतलं. केसरकर यांनी, आमचे दोन कोटी रुपये मंजूर करत असल्याचे सांगितले. तो प्रोजेक्ट पूर्ण झाला, संपला पण त्यांनी पैसे दिले नाहीत. तो त्याचा प्रोजेक्ट होता त्याचं त्याला कोणतही क्रेडिट दिलं नाही. पैसेही दिले नाहीत. त्याचं कुठे नावही नाही. तो प्रोजेक्ट रोहितचा आहे.”
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई: DRI कडून 47 कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!
गुरूवारी नेमक काय घडलं?
गुरुवारी मुंबईच्या पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या सतरा मुलांना आणि दोन पुरुषांना सोडण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या संशयिताचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. ओलिस ठेवणाऱ्याची ओळख ५० वर्षीय रोहित आर्य अशी झाली. सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण यांनी सांगितले की, सर्व मुले सुरक्षित आहेत. गुरुवारी दुपारी एल अँड टी इमारतीजवळील आरए स्टुडिओमध्ये ही नाट्यमय परिस्थिती एक तासापेक्षा जास्त काळ सुरू राहिली.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आर्यने सुमारे १५ वर्षांच्या मुला-मुलींना वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावले होते. त्याने असेही सांगितले की तो एअर गन आणि काही रसायने घेऊन येत होता. सुरुवातीला पोलिसांनी कारवाईदरम्यान गोळीबाराबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर संध्याकाळी ५:१५ वाजता मृत घोषित करण्यात आले.