मुंबई: अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.
कशी करण्यात आली कारवाई?
डीआरआयच्या अधिकाऱ्याला गुप्त माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे कोलंबोहून मुंबईत आलेल्या एका महिला प्रवाशाला विमानतळावर थांबवले. तिच्या सामानाची तपासणी केल्यावर कॉफी पावडरच्या नऊ पाकिटांमध्ये लपवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ आढळले. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यावर ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर तत्काळ पुढील सापळा रचून विमानतळावरच त्या कोकेनचा अपेक्षित प्राप्तकर्ता असलेल्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान या तस्करी साखळीत गुंतलेल्या आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ते या अमली पदार्थांच्या वित्तपुरवठा, लॉजिस्टिक्स, संकलन आणि वितरणाशी संबंधित होते. याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अमली पदार्थ आणि मनोव्यापारिक पदार्थ (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.
Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
सरकारी निविदा रक्कम न मिळाल्याने रोहित आर्य नाराज? मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी होता तरी कोण?
मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रोहित आर्य आहे तरी कोण?
मूळ पुण्यातील रोहित आर्यला तत्कालीन महाराष्ट्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागाकडून एका शालेय प्रकल्पाचे निविदा मिळाले होते. मात्र रोहितने दावा केला की त्यांना अद्याप या प्रकल्पाचे पैसे मिळाले नाहीत, ज्यामुळे त्यांना आर्थिक त्रास आणि मानसिक ताण आला. या प्रकरणाबाबत त्याने दीपक केसरकर यांच्या घराबाहेर अनेक वेळा निदर्शनेही केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत रोहित सोशल मीडियावर सरकार आणि व्यवस्थेविरुद्ध विधाने करत होता आणि स्वतःला अन्यायाचा बळी असल्याचे सांगत होता.






