रोहित आर्यच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल
पवई पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काउंटर
जवळपास 20 मुलांना ठेवले होते ओलिस
आर ए स्टूडियोमध्ये अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. दरम्यान या प्रकरणात पवई पोलिसांनी मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर केला आहे. पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. यामध्ये पोलिसानी त्याचा एन्काउंटर केला आहे.
मुलांची सुटका करताना रोहित आर्या आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी चालवलेली गोळी रोहित आर्याच्या छातीला लागली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मुलांची सुटका करताना पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला आहे.

ऑडिशनच्या बहाण्याने अनेक मुलांना ओलीस ठेवले, स्टूडिओबाहेर पोलिसांची गर्दी
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टुडिओमध्ये ऑडिशन्स सुरू होती. आज १०० मुले ऑडिशन्ससाठी आली होती. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने यापैकी ८० मुलांना घरी पाठवले, परंतु उर्वरित २० मुलांना स्टुडिओमधील एका खोलीत बंद केले. ही मुले खिडकीतून बाहेर डोकावत होती. दरम्यान, मुलांना कुलूप लावल्याची घटना उघडकीस येताच स्टुडिओबाहेर गोंधळ उडाला.
मुलांना ओलीस ठेवणाऱ्याने एक व्हिडिओ देखील जारी केला ज्यामध्ये तो धमकी देत म्हणतो की, आज आत्महत्या करण्याचा विचार करत होता, परंतु अचानक त्याने मुलांना ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना आरए स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ते ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी रोहितशी बोलणी सुरू केली.






