Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी फॉर्च्युनर लूटप्रकरणात पोलिसांचा करेक्ट कार्यक्रम; वेशांतर करून चौघांना पकडले

समृध्दी महामार्गावर लुटमार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना यश आले आहे. रात्राच्या अंधारात गावात लपून बसलेल्या आरोपींना १० हजारांचे अमिष दाखवत वेशांतर करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 07, 2026 | 09:35 AM
Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी फॉर्च्युनर लूटप्रकरणात पोलिसांचा करेक्ट कार्यक्रम; वेशांतर करून चौघांना पकडले

Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी फॉर्च्युनर लूटप्रकरणात पोलिसांचा करेक्ट कार्यक्रम; वेशांतर करून चौघांना पकडले

Follow Us
Follow Us:
  • १० हजारांच्या आमिषाने पोलिसांचा सापळा
  • वेशांतर करून लुट प्रकरणातील चार आरोपींना अटक
  • कायगाव टोका व तिसगाव परिसरात कारवाई;मुख्य आरोपीसह साथीदारालाही बेड्या
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर फॉर्च्युनर वाहनचालकाला अडवून लूट करणाऱ्या टोळीतील फरार आरोपींना पकडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चक्क वेशांतर करून सापळा रचला. ‘एका ट्रिपचे १० हजार रुपये देतो,’ असे आमिष दाखवत पोलिसांनी फरार आरोपीला गावाबाहेर बोलावून घेतले आणि त्याला अलगद ताब्यात घेतले. या कारवाईत चार फरार आरोपींना अटक करण्यात आली असून, वैजापूर दरोडा प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.

ठेकेदार बनून रचला सापळा

ओमकार रामचंद्र फसले हा आरोपी गावातच लपून बसल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिस थेट गावात गेल्यास आरोपी पसार होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदाराचे वेशांतर करून गावातील एका पानटपरीवर संपर्क साधला. ‘उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. वाळूचा हायवा चालवण्यासाठी चालक हवा असून, एका ट्रिपचे १० हजार रुपये देतो,’ अशी बतावणी करण्यात आली. पानटपरी चालकाने ही माहिती ओमकारच्या मित्राला दिली. पैशांच्या आमिषाने ओमकार तेथे आल्यानंतर वेशांतर केलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

एकाच गावातून तिघे ताब्यात

या कारवाईत ओमकार रामचंद्र फसले, भीमराव ऊर्फ शहादेव भगवान तांदळे, सुनील गणपत चव्हाण आणि सुनील कल्याण शेंडगे यांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या दुसऱ्या पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भीमराव तांदळे आणि सुनील चव्हाण यांना पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दरोड्यासाठी टोळीला स्वतःचे वाहन उपलब्ध करून देणाऱ्या सुनील शेंडगे यालाही तिसगाव परिसरातून अटक करण्यात आली. तो मुख्य आरोपी परशुराम गायकवाड याचा साथीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींना अटक झाली होती. मात्र, उर्वरित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर वेशांतर आणि आमिषाचा डाव आखत पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली.

Web Title: Samruddhi mahamarg robbery police execute a precise operation in the samruddhi fortuner robbery case four suspects nabbed after going undercover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.