देशभरात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातही सध्या सायबर क्राईममध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅास मेसेजद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहे. या संदर्भात येणाऱ्या तक्रारी पाहता सायबर फसवणूक (Cyber Crime) रोखण्यासाठी केंद्र सरकारने संचार साथी पोर्टलवर (sanchar sathi portal l) डेटा इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म आणि CHAKSHU प्लॅटफार्म लॅान्च करण्यात आलं आहे. संशयास्पद कॉल/मेसेजबद्दल तक्रार केल्यानंतर त्या फोन क्रंमाक सायबर गुन्ह्याशी संबंध आढळल्यास तो क्रमांक त्वरित निष्क्रिय केला जाईल.
[read_also content=”मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; समीर चौघुले, प्राजक्ता माळीसह स्वप्नील जोशीने केलं मतदान https://www.navarashtra.com/photos/marathi-celebrity-cast-their-vote-in-loksabha-election-2024-nrps-535622.html”]
संचार साथी पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणूक थांबवण्यासाठी आणि डिजिटल धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोठी कारवाई केली आहे. मोबाईल वापरकर्त्यांना सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
सरकारने आतापर्यंत 1 कोटी 70 लाख मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. याशिवाय या मोबाईल कनेक्शनला जोडलेले १ लाख ८६ हजार मोबाईल हँडसेटही ब्लॉक करण्यात आले आहेत. या सिम आणि मोबाईल हँडसेटचा सायबर गुन्ह्यांसाठी गैरवापर होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
बनावट मोबाईल कनेक्शन ओळखण्यासाठी सरकारने संचार साथी पोर्टल सुरू केले आहे. स्पॅम मेसेज, कॉल किंवा फिशिंग थांबवण्यासाठी Chakshu प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. बँका आणि सोशल मीडियाच्या सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँका, सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवली जात आहे.
या वेबसाइटवर तुम्हाला Citizen Centric Services वर क्लिक करून तुमची तक्रार नोंदवावी लागेल. तुमच्याशी संपर्क कसा झाला हे तुम्ही स्पष्ट केले पाहिजे? एसएमएस, कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे तक्रारीचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमच्या मोबाईलचा स्क्रीन शॉट जोडावा लागेल. तसेच धमकी देणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नोंदवावा लागणार आहे. यानंतर, त्या क्रमांकाच्या मदतीने, पोलिस आणि इतर यंत्रणा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करतील.