
नोकरीच्या आमिषातून लाखोंची फसवणूक
११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची केली फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यात घडली घटना
रत्नागिरी: तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मॅकेनिकला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांच्ची तीन संशयितांना फसवणूक केली. तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये एका अनोळखी महिलेचा सामावेश आहे. समीर महस्के (पुर्ण नाव माहित नाही) जनता सहकारी बँक क्लार्क नगर ठाणे, येथील बैंक खातेधारक रोहीत प्रकाश म्हसकर व अन्य अनोळखी महिला असे संशयित आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश धनावडे (वय ३३, रा. रिक्षा मॅकेनिक, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) संशयित समीर म्हस्के याने त्यांचा भाऊ तुषार धनावडे तसेच अन्य मित्र अजय विजय गोवळकर यांना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावतो, त्यासाठी पीस भरावयाचे लागतील असे सांगतिले.
११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची केली फसवणूक
फिर्यादी उमेश याने जनता सहकारी बैंक वर्तक न नगर ठाणे या बँकेतील रोहित प्रकाश म्हसकर या नावांच्या खात्यावर एकूण ६ लाख ८६ हजार ५६९ रु. तसेच वाडीतील मित्र तेज्या धनावडे यांच्या मोचाईलवरुन संशयित रोहित म्हसकर यांच्या अभ्युद्या को, ओक, बैंक लिमिटेड या बँका खात्यवार ९३ हजार ९५० रु. तर १ लाख ८क हजार रुपये बैंक ट्रान्स्फर असे टप्यारण्यात न केले. असे एकूण ११ लाख ३९ हजार ५११ रु. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यानी संशयित समीर म्हस्के याच्याकडे विश्वासाने बा ट्रान्सफर केलेले पैसे परत नाहितले असता संशविताने पुन्हा केलास तर बहून घेईन, अशी धमकी दिली. या प्रकरणी उमेश धनावडेनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवासंबंधित बनावट संकेतस्थळ, फसवे मोबाईल अॅप्स (एपीकेएस) तसेच मोबाईल एसएमएस, व्हॉटस्अॅपद्वारे खोट्या लिंक्स पाठवून नागरिकांची फसवणूक होत आहे, वाहन चालक, मालकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे नागरिकांनी बनावट संकेतस्थळ, अॅप्स आणि ई-चालान बनावट लिंक्सपासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आणि फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा असे आवाहन परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.