फोटो सौजन्य सोशल मिडिया
एका खाजगी डॉक्टराकडून हृदयविकाराच्या झटक्याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात आले. काशीगाव पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला असून खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (ठाणे येथील चेना बीट परिसर) जंगलामध्ये रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका गटाकडुन चुकून गोळीबार झाला. यात मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कामगार विजय सुखरू सापटे यांचा मृत्यू झाला. इतर दोनजण जखमी झाले आहेत. कुणाल शेलार आणि कल्पेश धंगाळा असे जखंमी झालेल्या व्यक्तींची नावे असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतदेह विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि हत्येच्या कलमांनुसार कारवाई करत काही जणांना व एका डॉक्टरला अटक करण्यात आली.
डॉ. राजेश पांलाडे यांनी विडिओ कॉल द्वारे मयताला बघून, विजय सुखरू सापटे यांचा मृत्यू घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे मृत्यू प्रमाणपत्र दिले. वास्तविक पांलाडे यांनी याबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे गरजेचे होते. पण तसे न करता मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ राजेश पांलाडे यांचे भाईंदरमध्ये आशिष मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल आहे. ते एक होमिओपॅथीमध्ये एम.डी. आहेत.
अटक झालेले डाॅक्टर राजेश पालांडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात सक्रीय असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी त्याचे निकटचे संबंध आहेत. काही महिन्यापूर्वी डॅाक्टर असोसिएशनच्या अध्यपदी त्यांची निवड झाली होती. या नियुक्तीचे प्रमाणपत्र स्वतःहा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आले होते. असे सांगण्यात येत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या गोळीबारात शस्त्राचा वापर कोणी केला, शस्त्र कोणाचे होते, त्याचा परवाणा होता का ? या बाबत चौकशी करण्यात येत आहे. तसेच महेश गायकर , कातोड , बिस्तूर आणि लाभड अशी अटक केलेल्यांची नावे समोर आली आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा- क्रमांक 01 आणि काशीगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Ans: सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे यांचा
Ans: विजय सापटे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप
Ans: गोळीबार कोणी केला, वापरलेले शस्त्र कोणाचे होते, त्याचा परवाना होता का, तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला या बद्दल तपास सुरू आहे






