Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; बंधु धनंजय देशमुख न्यायालयातील याचिका मागे घेणार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करुन वाल्मिक कराडच्या वाईन शॉपचा तपशील देत आरोप केले आहेत. खंडणीसाठीच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2025 | 04:14 PM
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; बंधु धनंजय देशमुख न्यायालयातील याचिका मागे घेणार
Follow Us
Close
Follow Us:

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या जवळपास सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीआयडीकडून या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरू आहे. आतापर्यंत तीन मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात या प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनीदेखील हे प्रकरण उचलून धरलं आहे. सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

या सगळ्यात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय धनंजय देशमुख यांनी घेतला आहे.

Delhi Election Date : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; या दिवशी होणार मतदान, या तारखेला निकाल?

संतोष देशमुख यांच्य हत्येची दाद मागण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीआधी त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. ‘आम्ही सध्या सुरू असलेल्या सीआयडीच्या तपासावर समाधानी आहोत. यामुळे ही याचिका वकीलामार्फत मागे घेतली आहे. गरज भासल्यास आम्ही भविष्यात पुन्हा याचिका दाखल करू,’ असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानियांचा वाल्मिक कराडवर आरोप

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करुन वाल्मिक कराडच्या वाईन शॉपचा तपशील देत आरोप केले आहेत. खंडणीसाठीच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडला अनेकांनी समाज सुधारक असे संबोधल्यानंतर दमानिया यांनी वाल्मिक कराडचे चार-पाच वाईन शॉप असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये काही पुरावेही सादर केले आहेत. बीडमधील केज, वडवनी, परळीमध्ये वाल्मिक कराडचे चार-पाच वाईन शॉप असून प्रत्येक वाईन शॉपचा बाजारभाव पाच कोटी असल्याचा दावा केला आहे.

Delhi Assembly Election 2025: निवडणुकांची घोषणा होताच केजरीवालांनी

संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यांची हत्या कशी झाली, याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सुरेश धस म्हणाले,” 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णु चाटेला 36 कॉल केले.   35 कॉलपर्यंत धनंजय देशमुख यांनी विष्णु चाटेला आपल्या भावाला सोडण्याासाठी विनंती केली.  प्रत्येक वेळी त्याने 20 मिनिटात तुझ्या भावाला पाठवतो, असं चाटे सांगत होता.  धनंजय देशमुख यांना 35 वेळा झालेल्या कॉलवर विष्णु चाटेने हेच सांगितलं. पण  36व्या कॉलला त्याने संतोष देशमुख यांचा मृतदेहच पाठवला.

Web Title: Santosh deshmukhs brother dhananjay deshmukh will withdraw the petition in the court nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Beed crime News

संबंधित बातम्या

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
1

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण
2

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Beed Crime: परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष, पोलिसांनी तीन नराधमांना केले अटक
3

Beed Crime: परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष, पोलिसांनी तीन नराधमांना केले अटक

Beed Crime: नातवानेच केली आजीची हत्या; आई वडीलदेखील जखमी; पैश्यासाठी केला वार
4

Beed Crime: नातवानेच केली आजीची हत्या; आई वडीलदेखील जखमी; पैश्यासाठी केला वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.