Photo Credit- Social Media निवडणुकांची घोषणा होताच केजरीवालांनी थोपटले दंड
नवी दिल्ली: दिल्लीतील सर्व 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली. दिल्ली निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही नक्कीच जिंकू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिले, “निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आणि उत्साहाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज व्हावे. तुमच्या उत्कटतेसमोर त्यांची मोठी यंत्रणा अपयशी ठरते. तुम्हीच आहात हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. ही निवडणूक कामाचे राजकारण आणि गैरवर्तनाचे राजकारण यांच्यातील असेल. दिल्लीतील जनतेचा आमच्या कामाच्या राजकारणावरच विश्वास असेल. आम्ही नक्कीच जिंकू.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि निकालाची तारीख जाहीर केली. दिल्ली विधानसभेसाठी 5 फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. नव्या वर्षात दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पहायला मिळतं. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन दिल्लीत होतं. त्यामुळे दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपतो आहे. 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा 6 जानेवारीला झाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याबाबतची घोषणा करतील. 18 फेब्रुवारीला ते निवृत्त होणार आहेत.
HMPV शरीराच्या कोणत्या अवयवार पहिले करतो Attack? शरीरात काय होतात बदल
दिल्लीत 1.05 कोटी हून अधिक मतदार आहेत. 2.08 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर 5 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी होणार आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत गेले आहेत. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेसनेही आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.