Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime: दांडके अन् लोखंडी हत्याराने हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कारण वाचाल तर…

Saswad Crime: दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2025 | 06:30 PM
Crime: दांडके अन् लोखंडी हत्याराने हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कारण वाचाल तर...

Crime: दांडके अन् लोखंडी हत्याराने हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कारण वाचाल तर...

Follow Us
Close
Follow Us:

सासवड: पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल निसर्गचे मालक मालक अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांढेकर यांना सात जणांनी टिकावाच्या लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने जिवघेणा हल्ला करून हॉटेलचे नुकसान केले. तसेच काऊंटर मधून १८,३०० रुपये जबरदस्तीने काढुन घेवून फरार झाले. याबाबत सासवड पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यास विरोध झाल्यानेच मारहाण करून रक्कम लुटून नेली. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

या घटनेत अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांडेकर जखमी झाले असून कैलास वांढेकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात अद्यापही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रेम उर्फ दत्ता राजु शेलार, अर्जुन महादेव शेलार, विशाल चव्हाण, शुभम जाधव सर्वजण( रा. भिवरी )तसेच भालचंद्र उर्फ गणेश शरद पवार( रा. म्हाडा कॉलनी सासवड, सर्वजण ता. पुरंदर )आणि दोन अल्पवयीनांसह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी लातूरला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाल्यानंतर तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने लातूर बसस्थानक येथे सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले.

बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी  तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी  यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, डीबी पथकाचे पोलीस हवालदार जब्बार सयद, लियाकतअली मुजावर, सुरज नांगरे, पोलीस नाईक गणेश पोटे, पोलीस शिपाई तुषार लोंढे, नवनाथ नानवर, प्रणय मखरे, अक्षय चिले, महीला पोलीस शिपाई यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्यात मोलाची कामगिरी केली. दरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके, लोखंडी कोयते या वस्तू जप्त केल्या असून सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवस होवून देखील एकही आरोपी अटक करण्यात आला नव्हता. त्यामुळे भिवडी गावच्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत तब्बल ४०० ते ५०० ग्रामस्थांनी संपूर्ण सासवड बाजारपेठेतून मूकमोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध केला होता. तसेच तातडीने आरोपी अटक करावे अन्यथा आमच्या मार्गाने बंदोबस्त करण्यास आम्ही सक्षम आहोत असा जाहीर इशारा दिला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस पातळीवरून जोरदार घडामोडी घडल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Saswad police arrested 7 accused about attempted assissination hotel owner purandar crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • Purandar
  • Saswad

संबंधित बातम्या

Saswad News: सासवड नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला चाप कधी बसणार?  
1

Saswad News: सासवड नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला चाप कधी बसणार?  

पुरंदरचा विमानतळ प्रकल्प रद्द करावा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
2

पुरंदरचा विमानतळ प्रकल्प रद्द करावा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

पुणे जिल्ह्यात भाजपचे ऑपरेशन लोटस! ‘हा’ बडा नेता काँग्रेसला ठोकणार रामराम, लवकरच पक्षप्रवेश
3

पुणे जिल्ह्यात भाजपचे ऑपरेशन लोटस! ‘हा’ बडा नेता काँग्रेसला ठोकणार रामराम, लवकरच पक्षप्रवेश

बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई कधी होणार? खोटी प्रमाणपत्र सादर करुन घेतली सवलत
4

बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई कधी होणार? खोटी प्रमाणपत्र सादर करुन घेतली सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.