Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saswad News: पगाराशिवाय काम कसे करायचे? सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी भेट देऊन तातडीने एक महिन्याच्या पगाराची रक्कम देण्याचे कबूल करत उर्वरित सर्व थकित रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 02:35 AM
Saswad News: पगाराशिवाय काम कसे करायचे? सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:
कंत्राटी कामगारांना पाच महिने पगारच नाही
कामगारांच्या वेतनाचा ठेका हा निधी एंटरप्रायजेस या कंपनीला 
जनतेला कोणीही वेठीस धरू नये असे आवाहन

सासवड: सासवड नगरपालिकेतील आरोग्य विभागातील सफाई महिला व पुरुष अशा सुमारे शंभर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतनाच्या कारणावरून आज बुधवारी सकाळी काही तास काम बंद करत ठिय्या आंदोलन केले. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप आणि मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांनी उपस्थित काही नगरसेवक व नागरिक यांच्या उपस्थितीत मार्ग काढल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.पालिकेच्या सफाई कामगारांच्या वेतनाचा ठेका हा निधी एंटरप्रायजेस या कंपनीला देण्यात आला आहे. परंतु गेली पाच महिने संबंधित ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाहीत त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्व कामगारांचा रोष वाढला व त्यातून बुधवारी दि. १८ रोजी त्यांनी अचानक काम बंद करत आपला निषेध नोंदवला. भाजप शहर अध्यक्ष आनंद भय्या जगताप, पालिकेतील विरोधी गटनेते मंदार गिरमे यांसह काहींनी याबाबत कामगारांची बाजू मांडत संबंधित ठेकेदाराला जबाबदार ठरवत मुख्याधिकारी यांना त्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली.

धक्कादायक! कर्मचाऱ्याच्या खात्यात चुकून ३३० पट पगार जमा; मग काय लोभापोटी त्याने केला ‘हा’ मोठा गेम!

नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी भेट देऊन तातडीने एक महिन्याच्या पगाराची रक्कम देण्याचे कबूल करत उर्वरित सर्व थकित रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले. सासवड शहर हे आपल्या सर्वांचे नगर असुन काम बंद करून जनतेला कोणीही वेठीस धरू नये असे आवाहनही जगताप यांनी केले

पालिकेत आमची सत्ता येऊन जेमतेम दोन महिने होत आहेत, यापूर्वी प्रशासन होते त्यामुळे कामगारांच्या प्रश्ना विषयी जागरूकतेने काम केले जाईल असे नगराध्यक्षा आनंदीकाकी यांनी स्पष्ट केले. १५ व्या वित्त आयोगाच्या निधी शासनाकडून मिळाला नाही परिणामी गेली पाच महिने वेतनविलंब झाला अशी माहिती मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांनी दिली. आज रोजी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ चे वेतन नगरपालिका फंडातून करण्यात आले असून उर्वरित रकमेसाठी प्राधान्य दिले जाईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

BCCI President Salary: बीसीसीआय अध्यक्षांना किती मिळतो पगार? त्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि अधिकारांविषयी जाणून घ्या

उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, आरोग्य समितीचे सभापती राजनभय्या जगताप, पाणीपुरवठा सभापती माऊली गिरमे, बांधकाम समिती सभापती माऊली जगताप, नगरसेवक बंडू राऊत, सचिन भोंडे, सोपान रणपिसे, अजित जगताप यांसह काही माजी नगरसेवक नागरिक व अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर कामगार कामावर रुजू झाले.

Web Title: Sadwas nagarparishad health department workers protest for salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Salary
  • Saswad
  • Saswad Nagarparishad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.