Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरातील पार्टीत बारबालांचा नाच; Video Viral, अद्याप कारवाई नाही

ही पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला. आणि त्याचे रुपांतर कोयते, तलवारी नाचवण्यात गेले. यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर कोयत्याने वार झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 12, 2024 | 08:18 PM
साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरातील पार्टीत बारबालांचा नाच; Video Viral, अद्याप कारवाई नाही

साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरातील पार्टीत बारबालांचा नाच; Video Viral, अद्याप कारवाई नाही

Follow Us
Close
Follow Us:

सातारा: सातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच पार्टी झाली. या पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या आहेत.यावेळी झालेल्या राड्यात आणि मारामारीत ३ जण जखमी झाले आहेत.  सध्या मोठ्या शहरांमध्ये रंगीत-संगीत पार्ट्यांचे पेव्ह फुटले आहे. अनेकदा पोलिसांकडून अशा पार्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली जाते, तर कधी अशा पार्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देखील होते.

त्यामुळे, महिला नाचवत किंवा बारबाला घेऊन काही ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. सातारा जिल्ह्यातही अशाच एका पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही पार्टी रंगली होती. या पार्टीदरम्यान झालेल्या भांडणात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, कुठलीही पोलीस कारवाई झाली नाही.

ही पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला. आणि त्याचे रुपांतर कोयते, तलवारी नाचवण्यात गेले. यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर कोयत्याने वार झाले. अंमली पदार्थ आणि दारू पिवून झालेल्या भांडणात दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. बाटल्या डोक्यात फोडण्याबरोबरच बाटल्यांची फेकाफेकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत. या रेव्ह पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडांनेच सोमवारी दुपारी झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याचे समजते. हॉटेलच्या फुटलेल्या काचांचे नुकसान भरुन देण्यात आले आहे.

एम. एच. 12 पासिंग असलेल्या दोन आर्टिगा गाड्यांमधुन आलेल्या 10 बारबाला या पुण्याच्या की पनवेलच्या यावरुनही साताऱ्यात गॉसिपिंग सुरू आहे. या पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे, बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे या पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला आहे. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Satara kas pathar party barbaa dance video and photos viral at social media police crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 08:18 PM

Topics:  

  • Kas Pathar

संबंधित बातम्या

Satara Kas Pathar : विविधरंगी फुले बहरले ‘कास पठार’! निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी अपार
1

Satara Kas Pathar : विविधरंगी फुले बहरले ‘कास पठार’! निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी अपार

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
2

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.