डब्यातील पुरी खाल्ल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, हैदराबादमधील धक्कादायक घटना (फोटो सौजन्य-X)
तेलंगणा हैदराबादमधून एक दु:खद घटना समोर आली असून शाळेत मधल्या सुट्टीतदरम्यान शाळेत डब्यातील पुरी खाल्ल्याने एका 11 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत मधल्या सुट्टीत दुपारच्या जेवणात पुरी खाल्ल्यानंतर एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टराकडून 11 वर्षीय त्याला मृत घोषित करण्यात आले.
हैदराबादमध्ये या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना पालकांनाही आपल्या मुलांना जेवताना नेमकं काय करायलं हवं हे शिकवण्यास भाग पाडत आह. शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान पुरी खाल्ल्यानंतर एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं विद्यार्थ्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
हैदराबाद येथील शाळेत सोमवारी दुपारच्या जेवणाची वेळ होती. त्यावेळी सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने जेवणादरम्यान एकाच वेळी तीन पुऱ्या खाल्या. यानंतर विद्यार्थ्याचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हैदराबादमधील बेगमपेट पोलीस ठाण्यात ही घटना घडली. मृताचे वडील गौतम जैन यांच्या तक्रारीवरून बेगमपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दररोज 140 महिलांची हत्या, महिला स्वत: च्या घरात असुरक्षित, अहवालातून धक्कादायक माहिती समोर…
जुना बोयगुडा, सिकंदराबाद येथील गौतम जैन यांचा मुलगा वीरेन जैन (11) हा परेड ग्राऊंडजवळील शाळेत सहाव्या वर्गात शिकत होता. सोमवारी दुपारी 12.20 वाजता जेवण करत असताना त्यांनी जेवणाच्या डब्यात ठेवलेल्या तीन पुऱ्या एकदम तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुरी घशात अडकली. पुरी अडकल्यामुळे वीरेन ला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. यामुळे वीरेन बेशुद्ध पडल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्याला घाईघाईने मर्दुपल्ली येथील गीता नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. इन्स्पेक्टर रामय्या म्हणाले, ‘विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिकंदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. नंतर घशात अडकलेल्या पुऱ्या बाहेर काढण्यात आल्या.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येच एका ३३ वर्षीय महिलेचा मोमोज खाल्ल्याने मृत्यू झाला होता. कार्टमध्ये मोमोज खाल्लेले सर्व लोक आजारी पडले होते. तपासादरम्यान असे आढळून आले की, दुकानदार अन्न सुरक्षा परवान्याशिवाय काम करत असून अन्न अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जात होते. मोमोजमध्ये वापरलेले पीठ पॅक न करता रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. याशिवाय रेफ्रिजरेटरचा दरवाजाही तोडण्यात आला. स्टॉल लावणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोथरूड हादरलं! धारदार हत्याराने तरूणावर हल्ला; नेमकं कारण तरी काय?