Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayush komkar Case update: पुण्यातील आयुष कोमकरची हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आंदेकर टोळीच्या सात जणांना अटक

आयुष कोमकर खून प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे. मेहकर तालुक्याजवळील एका गावाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 09, 2025 | 09:27 AM
Ayush komkar Case update: पुण्यातील आयुष कोमकरची हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आंदेकर टोळीच्या सात जणांना अटक
Follow Us
Close
Follow Us:
  • आयुष कोमकरची हत्या
  • आंदेकर टोळीतील सहा जणांना अटक
  • सूर्यकांत आंदेकर याच्यासह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल

Ayush komkar Case update: आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुण्यात गँगवारची पुन्हा चर्चा सुरू झाली असताना, पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत मुख्य आरोपींसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुलढाण्यात मध्यरात्री ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह सहा साथीदारांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई केली. आयुष कोमकर हत्याकांडानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गँगवारच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांच्या या कारवाईनंतर मात्र शहरात दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

नक्की झालं काय? रोहित शर्मा रात्री उशिरा का पोहोचला हाॅस्पिटलमध्ये? चाहते चिंतेत; Video Viral

आयुष कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये आंदेकर कुटुंबातील चार जणांचा समावेश असून दोन जण बाहेरील असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. सध्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी सुरू असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा शुक्रवारी नाना पेठेत दोन तरुणांनी गोळ्या झाडून खून केला. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी वनराज आंदेकरचा वडील सूर्यकांत आंदेकर याच्यासह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. तर काल मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाने सूर्यकांत आंदेकर आणि त्याच्या काही साथीदारांना बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून, पुढील कार्यवाहीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?

आयुष कोमकर खून प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे. मेहकर तालुक्याजवळील एका गावाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींमध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश असून इतर दोन जणांचीही नावे समोर आली आहेत. सर्वांना पुण्यात आणून पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी सुरू केली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Seven members of andekar gang arrested in ayush komkar murder case in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • crime news in marathi
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune News: संतापजनक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल
1

Pune News: संतापजनक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
2

Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर

पिस्तुले बाळगणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
3

पिस्तुले बाळगणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Vanraj Andekar News: वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन, टोळ्यांची बदला घेण्याची शपथ; आयुषने गमावला जीव
4

Vanraj Andekar News: वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन, टोळ्यांची बदला घेण्याची शपथ; आयुषने गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.