Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirur Crime: बसचालकाला अडवले, मारहाण केली अन् पैसे लुटले;शिरूर पोलिसांचा २४ तासांत करेक्ट कार्यक्रम

एसटी चालकाला रस्त्यात अडवून मारहाण करणारे आरोपी पोलिसांना चकवा देत होते. मात्र, तांत्रिक तपासाची कडी जुळली अन् अवघ्या २४ तासांत चौघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 07, 2026 | 12:19 PM
Shirur Crime: बसचालकाला अडवले, मारहाण केली अन् पैसे लुटले;शिरूर पोलिसांचा २४ तासांत करेक्ट कार्यक्रम

Shirur Crime: बसचालकाला अडवले, मारहाण केली अन् पैसे लुटले;शिरूर पोलिसांचा २४ तासांत करेक्ट कार्यक्रम

Follow Us
Follow Us:
  • एसटी चालकाला अडवून केली मारहाण
  • रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी फरार
  • गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू
Crime News: शिरूर परिसरात एसटी बसचालकाला अडवून मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या टोळी समोर आली आहे. तसेच पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. अशा या जलद कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण झालेला दिसून येत आहे.

बस अडवून केली मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक कर्तव्यावर असताना काही जणांनी त्याला अडवले. त्यानंतर आरोपींनी त्याच्याशी वाद घालत मारहाण केली. हल्ल्यानंतर चालकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: Crime News: हातावर बदामाच्या आकारातील त्या टॅटूमुळे समोर आले सत्य; धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर मायलेकाने घेतले टोकाचे पाऊल

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. तांत्रिक तपासाची मदत घेत संशयितांची हालचाल आणि संपर्काची माहिती तपासण्यात आली. त्याचवेळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता

तपासादरम्यान पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत एसटी चालकाला अडवून मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींची पुढील चौकशी सुरू असून, त्यांच्या साथीदारांचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा निर्जन मार्गावरून प्रवास करणाऱ्या एसटी चालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Shirur crime bus driver intercepted assaulted and robbed of cash shirur police swiftly crack the case within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.