पिंपरी : लघुशंका करताना शिंतोडे उडाल्याने दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड येथील भूमकर चौकात गुरुवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास मारहाणीचा हा प्रकार घडला होता.
राहुल कचरू घेवंदे (वय ४०, रा. भूमकर वस्ती, वाकड, मूळगाव चिखली. जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल यांच्या पत्नीने शनिवारी ( १२) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यश सुनील कलाटे (२२), मारुती किसन गुंडेकर (२१, दोघेही रा. कलाटे वस्ती, वाकड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल घेवंदे हे भूमकर चौकाजवळील मोकळ्या मैदानातून घरी जात होते. त्यावेळी तेथे यश कलाटे आणि मारुती गुंडेकर लघुशंका करत होते. त्यांच्या बाजूला राहुल घेवंदे देखील लघुशंका करत होते. त्यावेळी लघुशंकेचे शिंतोडे यश कलाटे याच्या पायावर पडले. त्या कारणावरून त्यांनी राहुल यांना शिवीगाळ केली. तू येथे लघवी का करतो, तुला निट लघवी करता येत नाही का, असे म्हणून संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी (दि. १२) त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
खेड तालुक्यातील बिरदवडी चौक वाय जंक्शनजवळ पाण्याच्या टँकरने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला.या घटनेबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन अरुण कड (वय ३५, व्यवसाय – शेती, रा. संतोष नगर भाम, ता. खेड, जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, त्यांना त्यांचे मामा उल्हास गाडे यांनी फोनवरून सांगितले की, त्यांच्या चुलत्याचा अपघात झालेला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट पेजद्वारे फसवणूक; विद्यापीठाकडून सावधगिरीचा इशारा
मृत्यू झालेल्या राघु ज्ञानोबा कड (वय ५७, रा. संतोष नगर भाम) हे त्यांच्या ॲक्टीवा दुचाकी (क्र. एमएच १४ एचए ५९३७) वरून आंबेठाण चौकाहून सुधवडी गावाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी बिरदवडी चौक वाय जंक्शनजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या पाण्याच्या टँकरने (क्र. एमएच १२ एचडी १३६४) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.या अपघातामुळे राघु कड रस्त्यावर पडले आणि टँकरचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर टँकर चालकाने कोणतीही मदत न करता पळ काढला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टँकर बेदरकारपणे चालविल्यामुळे झाला.