Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! १० वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; खून का नरबळी?

अरण ता माढा येथून गावच्या यात्रेमध्ये गेल्यानतर बेपत्ता झालेला १० वर्षीय मुलाचा मृतदेह कोरड्या कॅनॉलमध्ये सापडला आहे. मुलाच्या मृत्यूबाबत हा खून का नरबळी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 19, 2025 | 09:42 PM
Shocking! Body of missing 10-year-old boy found in canal; Murder or human sacrifice?

Shocking! Body of missing 10-year-old boy found in canal; Murder or human sacrifice?

Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी : अरण ता माढा येथून मंगळवारी १५ रोजी गावच्या यात्रेमध्ये गेल्यानतर बेपत्ता झालेला कार्तिक बळीराम खंडाळे वय १० वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह अरण पासून जवळच असलेल्या अरण करकंब रोड लगत जाधववाडी हद्दीतील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या कोरड्या कॅनॉल मध्ये शनिवारी सकाळी सकाळी अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.याठिकाणी नातेवाईकांनी आक्रोश केला असून त्याला कोणत्या कारणासाठी जीव मारले कि त्याचा नरबळी झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात असून या प्रकरणाने माढा तालुक्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अरण ता.माढा येथून यात्रेत जातो म्हणून इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.मागील पाच दिवसांपासून त्याचा शोध घेण्याचे काम चालू असताना त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत कुजलेल्या स्थितीत
आढळून आलेल्या ठिकाणावर ठिकाणी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा : Vaishnavi Hagawane Death Case: ‘कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार…’, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा

टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोलिस पथकासह आहेत.तर पुढील तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली असून तपास कार्य सुरू आहे.याठिकाणी अरण व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.त्याचे अपहरण झाले दिवसापासून त्याचा खून करण्यात आला कि त्याचा बळी देण्यात आला‌‌.कि आषाढ महिना चालू असल्याने अघोरी कृत्य करणा-यांनी नरबळी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात आहे.याचा खून झाला कि नरबळी दिला याचा शोध लावण्याचे टेंभुर्णी पोलीसांसमोर मोठे अहवान आहे.

‌हे प्रकरण गंभीर असून याचा खून झाला कि बळी दिला याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक, श्वानपथक,एलसीबी चे जगताप पथकासह बार्शी चे पोलिस उप अधिक्षक जालीदर नालकुल कुर्डुवाडी चे पोलिस निरीक्षक चिल्लावार, टेंभुर्णी चे पोलिस निरीक्षक नारायण पवार,आरसीपी पथकासह जवळपास १०० पेक्षा अधिक कर्मचारी घटनास्थळी होते. मृत कार्तीकचा मृतदेह हा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याचे सर्व नमुने घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मयत बालक कार्तिक हा दलित कुटुंबातील असून घटना उघडकीस आलेल्या ठिकाणी रिपाईचे बापूसाहेब जगताप,मातंग एकता आंदोलन चे रामभाऊ वाघमारे, सोलापूर चे नगरसेवक बबलु गायकवाड,सुनिल ओव्होळ,दिपक बनसोडे,अनिल जगताप यांनी हजेरी लावून या प्रकरणाचा कसून तपास करून मुळ आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा : Beed crime News :बीड मध्ये चाललंय तरी काय? तरुणाला दोन दिवस ठेवलं डांबून, अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू

अपहरण करून बळी दिल्याचा संशय

मोलमजुरी करून खाणारे खंडाळे कुटुंबाचे कोणाशीही वैर नाही.परंतु मागील पाच दिवसांपासून गायब असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे या १० वर्षीय बालकाचा आज शनिवारी मृतदेह आढळून आला असून त्याचे अपहरण करून त्याचा बळी दिला असल्याचा संशय आहे.पोलीसांनी त्याचा नरबळी झाला का कोणता बळी दिला याचा तपास करावा अन्यथा सर्व समाज आणि गावकरी आंदोलन करणार.

धनंजय मनोहर खंडाळे (नातेवाईक, अरण मयत कार्तीक खंडाळ)

Web Title: Shocking body of missing 10 year old boy from uran found in canal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • Solapur Crime News

संबंधित बातम्या

Solapur Crime: भेटवस्तू अन्  महागड्या हॉटेलमध्ये…, आशा सेविकांकडून गर्भवती महिलांची दिशाभूल; नेमकं प्रकरण काय?
1

Solapur Crime: भेटवस्तू अन् महागड्या हॉटेलमध्ये…, आशा सेविकांकडून गर्भवती महिलांची दिशाभूल; नेमकं प्रकरण काय?

माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत; गाईच्या कालवडावर झडप
2

माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत; गाईच्या कालवडावर झडप

Solapur Crime News: रणवीर राऊतांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेमकं घडलं काय?
3

Solapur Crime News: रणवीर राऊतांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेमकं घडलं काय?

भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत…
4

भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.