'कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार...', वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा (फोटो सौजन्य-X)
Vaishnavi Hagawane Death Case News in Marathi: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त होते. परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर आता वैष्णवीची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवीन अपडेट आली आहे. वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला व बालहक्क समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर आली आहे.ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार असूनया दिशेने पोलिसांनी तपास करावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
1. वरिष्ठ पो.अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता
2. जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा
3. प्रकरण आत्महत्येचे दिसत असले तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे
4. जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा
5. वैष्णवी हगवणेंना पती,सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण,छळ,जाच झाला
6. हुंडा रुपात ब्रँडेड गाडी,चांदीची भांडी,सोने,रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे
7. तपास तातडीने पूर्ण करा, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या..
पुण्यातील मुळशी तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबात ही घटना घडली. राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा शशांक याची पत्नी वैष्णवी हिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता.परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर वैष्णवीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक आणि तिची सासू आणि नणंद यांना अटक केली आहे.राजेंद्र हगवणे हे पुण्याच्या राजकारणात, विशेषतः मुळशीमध्ये एक मोठे नाव आहे. परंतु त्यांच्याच घरात अशा घटनेचा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. नेतृत्व गटाच्या घरी अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वैष्णवीच्या पालकांनी तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाच्या वेळी आम्ही हुंड्यात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर कार आणि इतर अनेक गोष्टी दिल्या होत्या. वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीवर अजूनही पैशासाठी दबाव आणला जात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केला आहे की तिचा पती, सासू आणि मेनणंद , ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना पोलिस कोठडीत व्हीआयपी सुविधा दिल्या जात आहेत.
असा आरोप आहे की, ऑगस्ट २०२३ मध्ये, जेव्हा वैष्णवी गर्भवती होती, तेव्हा शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून लावले. त्यानंतर, २७ नोव्हेंबर २०२३ रोजी, या छळाला कंटाळून वैष्णवीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारानंतर, वैष्णवी बरी झाली आणि तिला तिच्या सासरच्या घरी पाठवण्यात आले, परंतु छळ थांबला नाही. यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडून जमीन खरेदी करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्याने वैष्णवीला धमकावले आणि मारहाण केली. मार्च २०२५ मध्ये वैष्णवीला तिच्या सासू आणि वहिनींनी मारहाण केली आणि ती तिच्या सासरच्या घरातून निघून गेली.