बीड मधून सतत मारहाण, हत्या अश्या अनेक घटना समोर येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेचा विषय बनला आहे. बीड जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना समोर येत आहे. आता किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत सलग अमानुष मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा, नऊ जणांना अटक; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव अविनाश गोरोबा सगट असं मृत तरुणाचा नाव आहे. अविनाशची आई केशरबाई सगट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अविनाश मासे घेण्यासाठी गावातील वैभव सगट यांच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात कुणी नसल्याने तो आत गेला असता विमल सगट हिने त्याच्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील काही काही तरुणांनी मिळून त्याला रस्त्यावर पकडून जबरदस्तीने मारहाण केली.
एवढेच नाही तर, दुसऱ्या दिवशी अविनाशला जबरदस्तीने मोटारसायकलवरून उचलून नेले. अंजनपूर कोपऱ्याजवळील कॅनल परिसरात त्याला बांबूच्या काठ्या, लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शरीरभर मार लागल्याने आणि पोटात गंभीर दुखापत झाली आणि त्याची प्रकृती खालावली. त्याला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, सोलापूरातून एक धक्कादायक हत्येचा प्रकरण समोर आला आहे. कील पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या गंभीर अशा घटनेने एकच खळबळ उडाली.वसंत विहार परिसरातील स्वराज विहारमध्ये घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून वकिलाने पत्नीचा चाकूने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३९, रा. मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा, सध्या रा. स्वराज विहार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.