बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांचा एका तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचा आणि धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर राऊत एका तरुणाला अश्लील भाषा वापरत धमकी देताना दिसत आहेत.हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पण बहिणीची छेड काढल्याने जाब विचारल्याचे सांगत रणवीर राऊत यांनी सारवासारव केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओत रणवीर राऊत, ‘बार्शीत सुरक्षित राहायचं की नाही, नाहीतर तुमच्या सर्वांची मान मुरगाळून टाकेन, अशी धमकी देताना दिसत आहे. चारचाकी वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून त्यांनी वाद घातल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आली आहे. तसेच तुमच्या आज्याने आमचं काम केलंय म्हणून तुम्हाला सोडून देतोय, नाहीतर तुम्हाला ही धमकी झेपली नसती, असही रणवीर राऊत यांनी म्हटल्याचे दिसत आहे.
इतकेच नव्हे तर, बार्शीचे शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि बारबोले यांच्याही नावाचा उल्लेख करत रणवीर राऊत यांनी शिवीगाळ केली आहे. राजकारण करायचंय तर करा, राजकारणात वाकडं पाऊल नको, असंही ते म्हणताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ जवळपास आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. रणवीर राऊत यांचा मित्र चारचाकी वाहन घेऊन जात असताना दुसऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांना कट मारला, यावरून वाद सुरू झाला. वाद सुरूअसताना त्यांच्या मित्राने रणवीर राऊत यांना बोलवून घेतले. त्यामुळे वाद विकोपाला गेला.वाद करणारे तरूण हे विरोधी गटातील असल्याने रणवीर राऊत चांगलेच भडकले आणि त्यांनी थेट शिवीगाळ केली. वादविवाद होताना रणवीर राऊतांना पाहताच विरोधी गट शांततेची भूमिका घेतली. पण त्याचवेळी रणवीर राऊत यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ चित्रीत केली. रणवीर राऊतांचा हा व्हिडीओ बार्शीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातही व्हायरल झाला आहे.
IND vs ENG : हरमनची सेना इंग्लडविरुद्ध T20 मालिकेसाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार
2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले राजा राऊत यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांनी त्यांचा पराभव केला. राजा राऊत हे बार्शी मतदारसंघाचे माजी आमदार असून, त्यांच्या राजकीय वाटचालीकडे स्थानिक पातळीवर कायम लक्ष असते. दरम्यान, रणवीर राऊत हे राजा राऊत यांचे मोठे पुत्र आहेत.