फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड महिला T20 मालिकेच्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग : भारतीय महिला संघ आज इंग्लंड महिला संघ विरुद्ध खेळताना दिसणार आहे. हरमनप्रीत कोच नेतृत्वाखाली भारताचा संघ हा आज मैदानात उतरणार आहे. भारताचे संघाने मागील काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या सुरू होणाऱ्या मालिकेवर आज असणार आहे. भारताचा संघांमध्ये अनेक नव्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळाले आहे. टीम इंडिया आज इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे यास सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे मोफत पाहायला मिळणाऱ्या संदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग ही फॅन कोड आणि सोनी लिव ॲप येथे दाखवली जाणार आहे. या सामन्यांची लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांना सबस्क्रिबशन घ्यावे लागणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. या पहिल्या सामन्याचे आयोजन नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे करण्यात आले आहे.
भारताचा पुरुष संघ सध्या इंग्लडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. या सामनाच्या अर्ध्या तासासाठी नाणेफेक होईल. भारतीय महिला संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे. टीम इंडीयाने या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास संघाला मालिकेमध्ये आघाडी घेण्याची संधी मिळेल.
🗣️🗣️ Shafali Verma is a world class player and deserves this comeback. #TeamIndia vice-captain Smriti Mandhana ahead of the #ENGvIND T20I series opener tomorrow 👌👌@mandhana_smriti | @TheShafaliVerma pic.twitter.com/3Xxwpci0w3
— BCCI Women (@BCCIWomen) June 27, 2025
भारतीय महिला संघ इंग्लड महिला संघाविरुद्ध T20 मालिका त्याचबरोबर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आजपासुन T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये पाच सामने होणार आहेत. तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
पहिला सामना – 28 जून – ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदान
दुसरा सामना – 1 जुलै – सीट युनिक स्टेडीयम
तिसरा सामना – 4 जुलै – द ओव्हल
चौथा सामना – 9 जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवा सामना – 12 जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम