Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत

नर्सरीच्या मोकळ्या आवारात पावणेदोन वर्षांची चिमुकली नेहमीप्रमाणे खेळत होती; पुढच्याच क्षणी तिच्या आई-वडिलांसमोर अनर्थ घडला. टेम्पो मागे घेताना चालकाचे दुर्लक्ष झाले आणि चिमुकली थेट चाकाखाली आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 16, 2026 | 09:40 AM
Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत

Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत

Follow Us
Follow Us:
  • टेम्पोच्या चाकाखाली चिमुकली
  • रिव्हर्स घेताना काळाचा घाला
  • आई-वडिलांसमोरच अनर्थ
 

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्याजवळ टेम्पो मागे घेत असताना अवघ्या पावणेदोन वर्षांच्या चिमुकलीचा टेम्पोच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ‘ओंकार रोज नर्सरी’ परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. नर्सरीच्या मोकळ्या आवारात खेळत असलेल्या चिमुकलीला टेम्पोने धडक दिल्यानंतर ती मागील चाकाखाली आली. या घटनेने सोरतापवाडी आणि उरुळी कांचन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मूळचे मध्य प्रदेशातील असलेले स्वाकीद रमेश आदिवासी (वय २१) हे कुटुंबासह सोरतापवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांची पावणेदोन वर्षांची मुलगी रविवारी सकाळी नर्सरीच्या मोकळ्या आवारात खेळत होती. त्याचवेळी दिलीप रामचंद्र साहा (सध्या रा. सोरतापवाडी, मूळ रा. बिहार) हा टेम्पो घेऊन तेथे आला होता. काही कामानिमित्त टेम्पो मागे घेत असताना त्याचे मागील बाजूकडे पुरेसे लक्ष गेले नाही. टेम्पो मागे घेत असताना खेळत असलेली चिमुकली वाहनाच्या मागील बाजूस आली. चालकाला तिचा अंदाज न आल्याने टेम्पो पुढे सरकला आणि चिमुकली मागील चाकाखाली आली. चाक डोक्यावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकलीला पाहून कुटुंबीयांनी आरडाओरड केली. मात्र, तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नर्सरी परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अवघ्या पावणेदोन वर्षांच्या मुलीचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने तिच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा: Kolhapur Accident: अंबाबाईच्या दर्शनानंतर घरी परतताना काळाचा घाला; प्रसिद्ध मेस्त्रीचा अपघाती मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी चिमुकलीचे वडील स्वाकीद रमेश आदिवासी यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पोचालक दिलीप रामचंद्र साहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नर्सरी, वस्ती किंवा मोकळ्या जागांमध्ये वाहने मागे घेताना चालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेनंतर अधोरेखित झाले आहे. वाहनाच्या मागील बाजूस लहान मुले किंवा इतर व्यक्ती असल्याचे लक्षात न आल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वाहन रिव्हर्स घेताना मागील बाजू प्रत्यक्ष पाहणे, शक्य असल्यास मदतनीसाची मदत घेणे आणि परिसर सुरक्षित असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. या घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

Web Title: Soratwadi tempo accident toddler death uruli kanchan pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:40 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.