st bus collides with truck accident on pipalvivir to savardi route amravati 32 passengers injured no casualties read details here nrvb
अमरावती : अमरावती (Amravati) शहरातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन (Nandgaon Peth Police Station) हद्दीतील पिंपळविहिर ते सावर्डी (Pimpalvihir To Sawardi) येथे एसटीने (ST Bus) ट्रकला (Truck) पाठीमागून धडक दिली. या अपघातात एसटीतील प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुगणालय इर्विन (District General Hospital Irvine) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवळपास ३२ प्रवासी किरकोळ जखमी उपचारासाठी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. प्राप्त माहितीनुसार नागपूर ते आकोट मार्गे जाणारी एम.एच.४० एक्यू ६४३३ क्रमांकाच्या एसटीने पिपंळीविहीर ते सावर्डी या मार्गावर समोर असलेल्या एम.एच.२० बी.टी ७२८८ क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी हे प्रवास करत होते. यामुळे यातील बहुतांश प्रवासी हे जखमी झाले आहेत.
[read_also content=”‘काका मला वाचवा’ म्हणच ठरलीये सपशेल फोल! शेत जमीन नावावर केली नाही म्हणून भावाशी झाला वाद; अवघ्या चार वर्षांच्या पुतणीचा नदीत फेकून घेतला जीव; वाचा कुठं झालंय कांड https://www.navarashtra.com/crime/horrible-crime-news-a-dispute-with-the-brother-because-the-farm-land-was-on-mothers-name-a-four-year-old-nephew-was-thrown-into-the-river-dead-diksal-mohol-solapur-nrvb-371271.html”]
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली होती. यावेळी नांदगावपेठ पोलीसांनीही घटनास्थळ गाठून सर्व जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जवळपास ३२ प्रवासी हे उपचारासाठी दाखल झाले असून हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी आहेत.
[read_also content=”मोठी बातमी ! आता एकाच वेळी करता येणार दोन डिग्री कोर्स, UGC लवकरच लागू करणार नवे नियम; वाचा डिटेल्स https://www.navarashtra.com/education/big-news-ugc-will-soon-implement-new-rules-now-two-degree-courses-will-be-able-to-do-simultaneously-read-details-nrvb-371238.html”]
या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी इर्विन रुग्णालयात भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्याकडून माहिती घेत, जखमी रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.