Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच,‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2026 | 06:06 PM
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल ₹ 111 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीच्या बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 633 ठिकाणी तब्बल 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.

Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) या अनुभवी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.

प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये सुरक्षिततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यामुळे ‘लालपरी’ चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार आहे. हीच या प्रकल्पाची खरी यशोगाथा ठरणार आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Web Title: Digital shield for st security passengers to receive impenetrable protection through the new cctv project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी
1

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
2

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.