Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने जिन्याजवळील व्हरांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. उपस्थित महिला पोलिस, पोलिस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला रोखले व समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2026 | 03:42 PM
परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

पुणे : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेवेळी (NEET-२०२६) हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एक नाट्यमय प्रकार घडला. परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीच्या बाकावर मोबाईल फोन आढळून आल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीने जिन्यालगतच्या व्हरांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीची परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी नियमानुसार तपासणी करण्यात आली होती. हँड-हेल्ड मेटल डिटेक्टरने तिच्या मांडीजवळ दोन वेळा बीप दिल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांना संशय आला. याबाबत वरिष्ठ निरीक्षकांना माहिती देण्यात आली. विद्यार्थिनीने यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे मांडीमध्ये स्क्रू बसवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर स्वतंत्र खोलीत तिची सखोल तपासणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने वरिष्ठांच्या परवानगीनंतर तिला परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली.

NEET UG Frisking Controversy : सुरक्षा की छळ? NEET री-परीक्षेत विद्यार्थिनींना ‘पिरीयड्स’बद्दल विचारल्याचा आरोप; नेमके तथ्य काय?

केंद्रप्रमुख डॉ. नितीन घोरपडे यांनी दिलेल्या लेखी अहवालानुसार, परीक्षा सुरू असताना संबंधित विद्यार्थिनीच्या बाकावर मोबाईल फोन आढळून आला. यानंतर ब्लॉक सुपरवायझर यांनी तिला तातडीने महिला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने जिन्याजवळील व्हरांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. उपस्थित महिला पोलिस, पोलिस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला रोखले व समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.

यानंतर मोबाईल जप्त करून विद्यार्थिनीला कार्यालयात बसवण्यात आले. सीटी को-ऑर्डिनेटर यांच्या निर्देशानुसार तिला परीक्षा पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली. विद्यार्थिनीच्या पालकांनाही परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आले होते. परीक्षा संपेपर्यंत तिच्या वर्गाबाहेर महिला पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. शहरातील सर्व २६ परीक्षा केंद्रांवरील उत्तरपत्रिका नियमानुसार सिलबंद करून पायलट वाहन आणि सशस्त्र पोलिस बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आल्या. परीक्षा कालावधीत शहरभर सतर्क गस्त आणि वाहतूक व्यवस्थेचाही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Student attempt to jump and flee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Educational News
  • NEET Exam

संबंधित बातम्या

पुण्यात रुजतेय ‘सायलेंट रीडिंग’ची नवी क्रेझ; ग्रंथालयांच्या चार भिंतींऐवजी उद्याने बनली ‘ओपन एअर लायब्ररी’
1

पुण्यात रुजतेय ‘सायलेंट रीडिंग’ची नवी क्रेझ; ग्रंथालयांच्या चार भिंतींऐवजी उद्याने बनली ‘ओपन एअर लायब्ररी’

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..
2

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.