Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: महाबळेश्वरातून लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेल्या संशयिताला अटक; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

मुंबईतील व्यावसायिकाला धमकी दिल्याच्या तपासाला पाचगणीतून अटक झालेल्या संशयितामुळे धक्कादायक वळण मिळाले आहे. पाकिस्तानी हँडलरशी संपर्क आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा तपासात दावा; दोन मोबाईल आणि डायरी जप्त.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 13, 2026 | 03:00 PM
Crime News: पाचगणीतून लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेल्या संशयिताला अटक; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Crime News: पाचगणीतून लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेल्या संशयिताला अटक; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • पाचगणीत मुंबई क्राईम ब्रँचची कारवाई
  • पाकिस्तानी हँडलरशी संपर्क असल्याचा संशय
  • दोन मोबाईल आणि डायरी जप्त; अन्य संशयितांचा शोध सुरू
सातारा: मुंबईतील एका व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातील पाचगणीतून एका ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तपासादरम्यान त्याचे पाकिस्तानातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे समोर आल्याचा दावा मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाला धमकी देण्यात आल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. या तपासाची कडी पाचगणीपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद शफीक लोन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा:‘मनःशांती मिळाली’ म्हणत पत्नीने पतीला संपवलं; पतीची हत्या अन् मृतदेहाची चिरफाड, काढलेले अवयव देवीला अर्पण करून तिला…

पाकिस्तानी हँडलरशी संपर्काचा संशय

तपासात आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात आल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच माध्यमातून मुंबईतील व्यावसायिकाला धमकी देण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. दरम्यान, आरोपीचा भाऊ लष्कर-ए-तोयबामध्ये कमांडर असल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे आरोपीचे परदेशातील तसेच इतर संशयितांशी असलेले संपर्क तपासले जात आहेत.

हेही वाचा:Accident News: गणेशोत्सवाच्या प्रवासाला वरंधा घाटात अपघाताचे गालबोट; दोन कारचा चक्काचूर,तिघे गंभीर

दोन मोबाईल आणि डायरी जप्त

मुंबई गुन्हे शाखेने आरोपीकडून दोन मोबाईल फोन आणि एक डायरी जप्त केली आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहिती तसेच डायरीतील नोंदींच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. आरोपीच्या सोशल मीडिया अकाउंट्सचीही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आरोपीने कोणाच्या सांगण्यावरून व्यावसायिकाला धमकी दिली, त्याचा इतर व्यक्तींशी नेमका काय संपर्क होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके काम करत आहेत. तसेच या प्रकरणातील लष्कर-ए-तोयबाशी संबंध आणि पाकिस्तानी हँडलरशी संपर्काबाबतचे आरोप हे पोलिसांच्या तपासातील दावे असून, पुढील तपासातून या बाबींची अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

Web Title: Suspect linked to lashkar e taiba arrested from panchgani major operation by mumbai crime branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 02:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.