
Jawaharlal Nehru University, Bajrang Dal, VHP protest,
VHP threat to JNU students: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या आक्षेपार्ह घोषणांच्या निषेधार्थ, बजरंग दल आणि विश्व हिंदी परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बजरंग दल आणि विहिंपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून नेहरू विद्यापिठात सामुहिक हनुमान चालिसाचे पठण आयोजित केले. इतकेच नव्हे तर विहिंपचे प्रांत मंत्री सुरेंद्र गुप्ता यांनी जेएनयू च्या विद्यांर्थ्यांना थेट कबर खोदण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे दिल्लीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान चालिसाच्या पठणाच्या पूर्वी विहिंपचे दिल्ली प्रांतमंत्री सुरेंद्र गुप्ता यांनी जेएनयुमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी दिली आहे. “JNUमध्ये कबरी खोदण्याच्या घोषणा देणाऱ्यांच्या कबरी आम्ही JNUमध्येच खोदू. ते घरी जाऊ शकणार नाहीत. आम्ही त्यांच्या तोंडावर काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढू. सनातनने इथे आलेल्या सर्व जिहादींच्या कबरी खोदल्या आहेत. बजरंग दल आता सनातनच्या भूमीवर आलेल्या जिहादींच्या कबरी खोदेल. सर्व देव येथे राहतात, जे आपल्याला देशाच्या शत्रूंचा नाश करण्याची शक्ती देतात.” अशा शब्दातं सुरेंद्र गुप्तांनी आक्षेपार्ह विधाने केली आहे.
विहिंप दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष कपिल खन्ना म्हणाले की, JNUला आमचा संदेश आहे की, आम्ही त्यांचे दुष्कृत्य यशस्वी होऊ देणार नाही. लवकरच, आम्ही अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करू. आता हिंदू जागृत झाले आहेत आणि जो कोणी डोळे वर करून पाहण्याची हिंमत करेल त्याचे डोळे फोडून टाकले जातील. १,००० वर्षांपूर्वी गझनी नावाचा एक दरोडेखोर आला होता आणि त्याने सोमनाथ मंदिर लुटले. त्याने ते वारंवार उद्ध्वस्त केले, परंतु आम्ही ते पुन्हा पुन्हा बांधले आणि आज ते त्याच्या मूळ स्वरूपापेक्षाही अधिक भव्य आहे. आम्ही ५०० वर्षे संघर्ष केला आणि भगवान रामाचे मंदिर बांधले. आमचा संकल्प आहे की जो कोणी आमच्याशी संघर्ष करेल त्याचे तुकडे तुकडे केले जातील.
कपिल खन्ना एवढ्यावरच थांबले नाहीत तर, लवकरच, आम्ही अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करा. आता हिंदू जागृत झाले आहेत. लवकरच, मथुरा येथील एका भव्य मंदिरात कृष्ण लल्ला विराजमान होतील. दिल्लीत कोणीही लव्ह जिहाद किंवा लँड जिहाद पसरवू देणार नाही. जर कोणी डोळे वर केले तर त्यांचे डोळे फोडून टाकू.
याशिवाय विहिंपकडूनही हा केवळ एक कार्यक्रम नाही तर एक वैचारिक प्रतिसाद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्राचा अपमान केला जात असताना, राष्ट्रवादाचा स्पष्ट, तार्किक आणि प्रतिष्ठित आवाज आवश्यक आहे. निषेध हा केवळ आवाजाचा नाही तर विचार, इतिहास आणि सत्याचा आहे. म्हणून, तरुणांना दिशा हवी आहे, गोंधळाचा नाही आणि हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.