Crime News: पोलीस असल्याचे सांगितले अन् महिलेचे...; 'या' शहरातील धक्कादायक घटना
पुणे: सिंहगड रोड परिसरात पोलीस असल्याच्या बतावणीने महिलेचे सहा लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव बुद्रुक परिसरातील एका मंगल कार्यालयात आल्या होत्या.
विवाह समारंभ आटोपून त्या दुपारी तीनच्या सुमारास मंगल कार्यालयातून बाहेर पडल्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्याने खाकी रंगाची पँट परिधान केली होती. त्यांनी महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी केली. या भागात महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. नंतर महिलेने पिशवीत दागिने ठेवली. पिशवीत दागिने ठेवले का नाही, याची तपासणी करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी महिलेच्या नकळत दागिने काढून घेतले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत.
चोरी करुन पळून गेलेल्या चोरट्याला पकडले
चोरी केल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी चार महिन्यांनी जेरबंद केले आहे. तेव्हा त्याने चोरलेले पैसे बँक खात्यात ठेवले अन् त्यातले काही पैसे खर्च देखील केले. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपये बँकेत गोठवले. तसेच एक लाख रुपयांचा आय फोन जप्त करण्यात आला आहे. डेबज्योती करुणामय डे (वय २८, रा. खरागुण, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. डेबज्योती डे याने एका घरात शिरुन ७ लाख २० हजार रुपये व आय फोन चोरी केला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले. तसेच चोरलेली सर्व रक्कम जप्त केली आहे.
हेही वाचा: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; चोरी करुन पळून गेलेल्या चोरट्याला पकडले
पोलीसांकडून शहरातील पाहिजे व फरार आरोपींवर पाळत ठेलली जात आहे. नव्या वर्षाच्या १५ दिवसात २०२३ व २०२४ मधील ७ गुन्ह्यांची उकल केली आहे. २०२३ मध्ये जबरी चोरी करुन फरार असलेला उसामा शफिक शेख (वय २३, रा. सैय्यदनगर, हडपसर) याला अटक करुन हिसकावुन नेलेला ४५ हजार रुपयांचा मोबाईल केला आहे. २०२३ मध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ५ लाख रुपयांची फसवणूक करणार्या आशिष रामदास मानकर (वय ४८, रा. वाघोली) याला अटक केली.
औंध भागात घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.