Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

पीएमपीच्या अनेक बसमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. वाहकांची कॅश तपासणी होताना क्वचितच दिसते. अनेक बसवर रूट बोर्ड लावलेले नाहीत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 06:33 PM
PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ 'कमाई'चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून...; स्वच्छतेचा अभाव अन्...

PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ 'कमाई'चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून...; स्वच्छतेचा अभाव अन्...

Follow Us
Follow Us:

संबंधित गोष्टींच्या तपासणीसाठी ३२१ चेकरची नेमणूक 
इतर कामाकडे पूर्णपणे केले जातेय दुर्लक्ष
नऊ महिन्यात १ कोटी दंड वसूल

चंद्रकांत कांबळे/ पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून बस व त्यासंबंधित बाबींची तपासणी करण्यासाठी अधिकारी आणि मदतनीस मिळून एकूण ३२१ चेकरची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र, हे चेकर इतर कोणत्याही बाबींकडे लक्ष न देता डोळ्यांना झापड लावून केवळ फुकट्या प्रवाशांवर (Pune News) कारवाई करण्यावरच लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्येही अनेक तांत्रिक अडचणी आहेत. उदाहरणार्थ, ऑनलाइन स्कॅन न चालणे, ॲप काम न करणे अशा परिस्थितीत एखाद्या प्रवाशाला जवळच्या थांब्यावर उतरायचे असल्यास पीएमपीच्या बसमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे काही वेळा तिकीट काढणे शक्य होत नाही. परिणामी, हे चेकर कोणतेही कारण न ऐकून घेता थेट ५०० रुपयांची पावती फाडल्याशिवाय प्रवाशांना सोडत नाहीत.

चेकरचे नेमके काम काय?

चेकरचे मुख्य काम प्रवाशांची तिकिटे तपासणे, रूट बोर्ड व मार्गदर्शक फलकांची पाहणी करणे, वाहकांची अचानक कॅश तपासणी करणे,चालक कुठलाही थांबा चुकवत नाही ना हे पाहणे, तसेच चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवत नाही ना याची खात्री करणे.तसेच इतरही कामाचा यामध्ये समावेश आहे. या सर्व कामांसाठी मुख्य चेकर १४५ आणि मदतनीस १७६ असे एकूण ३२१ चेकर नेमण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. कारण बहुतांश वेळा हे चेकर फक्त तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यावरच विशेष भर देत आहेत.

Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…

पीएमपीचे चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवतात

पीएमपीचे काही चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? वारंवार प्रवाशांकडून तक्रारी करूनही याच्यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. मग अशा गंभीर बाबींवर थेट कारवाई का होत नाही, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

नऊ महिन्यात १ कोटी दंड वसूल

पीएमपी प्रशासनाकडून एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून १ कोटी २ लाख दंड वसून केलेला आहे. प्रत्येक प्रवाशाकडून ५०० रुपये दंड आकारला जातो.

चेकर महोदय, जर इकडेही लक्ष द्या

पीएमपीच्या अनेक बसमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. वाहकांची कॅश तपासणी होताना क्वचितच दिसते. अनेक बसवर रूट बोर्ड लावलेले नाहीत. चेकरनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचीही गरज आहे.

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…

मी अकोला येथून काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले आहे. गांजवे चौक येथून गुडलक चौक येथे जात असताना बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे मला तिकीट काढणे शक्य झाले नाही. माझे अंतर खूपच कमी असल्याचे मी त्यांना सांगत होते. तरीही त्यांनी माझ्याकडून ५०० रुपयांचा दंड घेतला. अन्यथा पोलीस स्टेशनला चला, असे सांगितले. मला महत्त्वाचे काम असल्यामुळे मी पैसे देऊन निघून गेले.

— आकांक्षा पाटील, प्रवासी

Web Title: Pmp checker try only earn to inspection neglet about passengers problem cctv camera and uncleanness pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.