Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljabhavani Mandir News: तुळजापूर मंदिरातील पुजारीच निघाले ड्रग्ज तस्कर; 13 जणांच्या नावांचा समावेश

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची राजकीय घडामोडींत भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याचे संबंध भाजप पक्षाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 09, 2025 | 03:00 PM
Tuljabhavani Mandir News: तुळजापूर मंदिरातील पुजारीच निघाले ड्रग्ज तस्कर; 13 जणांच्या नावांचा समावेश
Follow Us
Close
Follow Us:

तुळजापूर:   मागील काही दिवसांपासून  तुळजापूरमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्यासाठी  गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारीच्या कारवायाही केल्या. या ड्रग्ज प्रकरणाला राजकीय संदर्भही जोडले गेले होते. हे सर्व सुरू असतानाच आता तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजारीच ड्रग्ज तस्करीत संल्ग्न असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बहुतांश पुजारी ड्रग  पेडलर असल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळाली आहे.

मंदिर प्रशासनाच्या पुजारी मंडळाने संबंधित आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली असून, सर्व पुजाऱ्यांना दोषी ठरवून बदनामी करू नये, असे आवाहन केले आहे. कारण त्यातील काही आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेमध्ये सहभागी नव्हते, असा दावाही पुजारी मंडळाकडून करण्यात आला आबहे. सध्या या प्रकरणात एकूण ३५ जण आरोपी आहेत, त्यापैकी २१ अजूनही फरार आहेत. त्यात १३ पुजाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, मंदिरातील नियमित पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका पुजारी मंडळाकडून मांडण्यात आली आहे.

Pune Sassoon Hospital : ‘ससून’ची सुधारणा अन् सुरक्षेसाठी मोठा निर्णय! रुग्णालयात आता पोलीस चौकी

तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणाला काही दिवसांपूर्वी राजकीय संदर्भ प्राप्त झाला होता. या प्रकरणातील काही आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, त्यांच्यासोबत खासदार निंबाळकर यांचे फोटो समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३५ आरोपींची नावे पुढे आली असून, त्यापैकी २१ आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. पुजाऱ्यांची नावे सार्वजनिक होताच गाव आणि मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

IAS Transfer : कल्याण-डोंबिवलीसह राज्यात पाच बड्या IASअधिकाऱ्यांच्या बदल्या

या प्रकरणातील काही आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघेही ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी असून, त्यांच्या सोबत खासदार निंबाळकर यांचे फोटो सार्वजनिक झाले आहेत.

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची राजकीय घडामोडींत भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याचे संबंध भाजप पक्षाशी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चंद्रकांत उर्फ बापू कने, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष, हेही भाजपशी संलग्न असून, त्यांनी मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार केला होता. विनोद उर्फ पिटू गंगणे, हे माजी नगराध्यक्षांचे पती असून त्यांचाही भाजपशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Tuljapur temple priest turns out to be drug smuggler 13 names included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • tuljapur news

संबंधित बातम्या

माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मीडियावरती बदनामी……..; पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने संपवलं आयुष्य
1

माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मीडियावरती बदनामी……..; पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने संपवलं आयुष्य

देवदर्शनास जाताना भीषण अपघात; 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू तर 7 जण गंभीर
2

देवदर्शनास जाताना भीषण अपघात; 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू तर 7 जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.