Photo Credit- Social Media कल्याण-डोंबिवलीसह राज्यात पाच बड्या IASअधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाशी निगडित ९ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रशासकीय विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत.
या बदल्यांमध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनीता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची माहिती लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे.
सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा! 7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेची प्रकृती…
गेल्या तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे (केडीएमसी) आयुक्तपद इंदुराणी जाखड सांभाळत होत्या. त्यांचीही बदली करण्यात आली आहे. आता अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची महापालिका असून मुंबईच्या जवळ असल्याने प्रशासकीयदृष्ट्या या पदाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नव्या आयुक्ताच्या निवडीबाबत औत्सुक्याचं वातावरण होतं. अखेर सात दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अभिनव गोयल यांची केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने महापालिकेच्या कारभाराला नवे नेतृत्व लाभले असून, प्रशासनाच्या गतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अभिनव गोयल यांची प्रशासकीय वाटचाल २०१८ मध्ये नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, तसेच अलीकडेच हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. कल्याण-डोंबिवली महापालिका ही ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख आणि वेगाने वाढणारी महानगरपालिका आहे. मुंबईच्या शेजारी असल्याने या शहराचा विकास आणि नागरी सेवांचा विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर अभिनव गोयल यांची नियुक्ती प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारने वफ्फ विधेयक कायद्यात बदल केल्यानंतर हा आरडाओरड कशाला? भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते यांचा
राज्य सरकारकडून ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, विविध महत्त्वाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महसूल, माहिती तंत्रज्ञान आणि नागरी प्रशासनाशी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सी. के. डांगे : यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
संजय काटकर : यांची नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
अनीता मेश्राम : यांची अकोला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्या यापूर्वी महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या.
अभिनव गोयल : हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
आयुषी सिंह : यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.