Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव कार कठड्यावर आदळली, दोघांचा मृत्यू, केज-अंबाजोगाई मार्गावरील धक्कादायक घटना

केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील चंदनसावरगाव शिवारात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 01:36 PM
भरधाव कार कठड्यावर आदळली, दोघांचा मृत्यू, केज-अंबाजोगाई मार्गावरील धक्कादायक घटना

भरधाव कार कठड्यावर आदळली, दोघांचा मृत्यू, केज-अंबाजोगाई मार्गावरील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • भरधाव कार कठड्यावर आदळली
  • दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी
  • केज-अंबाजोगाई मार्गावरील धक्कादायक घटना
केज : केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील चंदनसावरगाव शिवारात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८, दोघे रा. जवळबन) यांचा मृत्यू झाला आहे. तर दत्ता तपसे (४३, रा. चंदनसावरगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केजहून जवळबनकडे तिघे कारमधून प्रवास करत होते. पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कठड्यावर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की, वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तिघेही कारमध्ये अडकून पडल्याने घटनास्थळी काही काळ मदतकार्याची धावपळ सुरू झाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार केशव खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातील तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे यांना मृत घोषित करण्यात आले. दत्ता तपसे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती जवळबन येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली आहे. अपघातामागील नेमके कारण तसेच वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास पोलिस करत आहेत.

कारचा पुढील भाग झाला चक्काचूर

केज-अंबाजोगाई महामार्गावर चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात भरधाव कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळली. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनातील तिघे अडकले होते. ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदतकार्य करून त्यांना बाहेर काढले. रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात आले, तर एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

पोलिसांचे मदतकार्य

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार केशव खाडे यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा  : अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Web Title: Two people have died in an accident involving a speeding car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.