दुकान फोडून साहित्य चोरी करणारा अटकेत; सातारा शहर डीबी पथकाची कारवाई
अचलपूर : अमरावती रोडवर असलेल्या एका गावातून परतवाडा येथे कोचिंगसाठी आलेल्या शाळकरी मुलींचा पाठलाग करणे, फोटो काढणे, अश्लील कृत्य करणे आणि छेडछाड केल्याप्रकरणी मदन इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक व चालकावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
हेदेखील वाचा : माणुसकीला काळीमा फासणारी घटना: 500 रुपयांसाठी वाद, सख्ख्या भावाने केली भावाची हत्या
घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना फोन करून घटनेची माहिती दिली असता हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी घटनास्थळ गाठून आरोपीला रंगेहात पकडले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. विद्यार्थिनींनी सांगितले की, आरोपी दररोज त्यांचा पाठलाग करत असे आणि अश्लील हावभाव करत त्यांचे फोटो काढायचे. परतवाडा बसस्थानकात उतरल्यानंतर बाजार समिती रस्त्यावरून जात असताना आरोपी त्यांचा पाठलाग करत आणि वेल्डिंग वर्कशॉपमधून त्यांना पाहून अश्लील कृत्य करत असत.
घटनेच्या दिवशी विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दुचाकी आणि चारचाकीवरून दोन जण आपला पाठलाग करत असल्याची माहिती दिली. पालकांनी तत्काळ बसस्थानक गाठले. नागरिकांच्या मदतीने दोघांनाही पकडले. चौकशीत दोघेही मदन इंजिनीअरिंग वर्क्सचे संचालक व चालक असल्याचे समोर आले. पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर परतवाडा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पुण्यातील स्वारगेट भागात वेश्या व्यवसाय
पुण्यातील स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रीती मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लर चालक सुनीता नामदेव मांजरे (वय ३३) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.